शिवप्रहार न्युज - हॉस्पीटल येथून लॉजवर नेवून नर्सिंगच्या तरुणीचा श्रीरामपुरात विनयभंग! 

शिवप्रहार न्युज -  हॉस्पीटल येथून लॉजवर नेवून नर्सिंगच्या तरुणीचा श्रीरामपुरात विनयभंग! 

हॉस्पीटल येथून लॉजवर नेवून नर्सिंगच्या तरुणीचा श्रीरामपुरात विनयभंग! 

श्रीरामपूर ( शिवप्रहार न्युज) श्रीरामपूर शहरातील एका हॉस्पीटल येथून २१ वर्षे वयाच्या नार्सिग शिकणाऱ्या तरुणीला आरोपी रोशन वसंत वाघ याने धमकावून दुचाकीवर बळजबरीने बसवून, श्रीरामपूर शहरातील नावाजलेल्या लॉजवर नेवून, लॉजच्या खोलीचा दरवाजा लावून ,तु मला खुप आवडते असे म्हणत बळजबरीने लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करून विनयभंग केला. तसेच तु माझ्याशी संबंध ठेव, व्हॅट्सअपवर कॉल घेत जा ,बोलत जा असे म्हणत धमकावले! पुन्हा दुचाकीवर बसवून बाभळेश्वर राहाता परिसरात तिला फिरवले व रात्री ८ च्या सुमारास नेहरू मार्केट मंडई जवळ सोडले!    

           पिडीतेच्या वरील फिर्यादी करून शहर पोलीसात आरोपी रोशन वाघ विरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ कलम १३७ (z ) ७४ ,७५ .( Z) ११५ ( २ ) ,३५१ (z ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोनि देशमुख यांच्या मार्गदर्शना खाली पुढील तपास व आरोपीचा शोध पोना बारसे हे घेत आहेत.

       या घटने संबंधी शहरातील काही हॉस्पीटलशी संपर्क साधला असता डॉक्टरांनी कानावर हात ठेवले!आरोपीने तरुणीस मारहाण करून धमकी दिली असल्याचे सांगितले आहे.                

डॉक्टरचा अटॅकने मृत्यु!      

श्रीरामपूर ( शिवप्रहारन्यूज ) श्रीरामपूर तालुक्यातील सोपान तुकाराम गोरे या तरुणास काल साखर कामगार रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले असता तेथील डॉक्टरांनी तपासले असता सोपान तुकाराम गोरे यांचा उपचारापूर्वीच मृत्यु झालेला होता . 

         या प्रकरणी रुग्णालयाच्या खबरीवरून श्रीरामपूर तालुका पोलीसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली असून पोनि चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरु आहे . दरम्यान जनावरांचे डॉक्टर सोपान गोरे यांचा अटॅक ( हदयविकार) ने मृत्यु झाल्याचे सांगण्यात येते . या घटनेने हळहळ व्यक्त होत आहे .