शिवप्रहार न्युज - ICU मधील पेशंटला गळा दाबून मारहाण! डॉक्टरसह कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल!!
ICU मधील पेशंटला गळा दाबून मारहाण! डॉक्टरसह कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल!!
नगर/ श्रीरामपूर ( शिवप्रहार न्युज) नगर शहरातील मोठे रुग्णालय म्हणून ओळख असलेल्या सुरभी रुग्णालयातील ICU मध्ये उपचारासाठी दाखल असलेले रुग्ण/पेशंट श्री.वसंत वामन गाडे,रा. चिंचोडी पाटील,तालुका नगर,जिल्हा -अहिल्यानगर यांनी डॉक्टरला विचारले लघवी करायची आहे ,तेव्हा तेथील कर्मचारी यांनी वसंत गाडे यांना बेडवर ढकलून दिले.त्यामुळे गाडे यांना पलंगाचा गज लागून डोक्याला मार लागला. त्यानंतर त्यांचे बेडला हात-पाय बांधून तोंडावर,डोळ्यावर मारहाण करण्यात आली व “अगर आवाज किया तो मार डालुंगा” अशी रुग्ण वसंत गाडे यांना धमकी दिली गेली.रात्री च्या सुमारास रुग्णालयात हा प्रकार घडला.
याप्रकरणी रुग्णाचा मुलगा विजय वसंत गाडे याने तोफखाना पोलीसात फिर्याद दिल्या वरून आरोपी डॉक्टर वैभव अजमेर, व सर्जिकल वार्डमधील कर्मचारी,सुरभी हॉस्पीटल यांच्या विरुद्ध भारतीय न्याय सहिंता कलम १०९ ,११५ ,१९५ (२) ,३५२ ,३५ १ ( २),(३) ,३ (५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पोनि प्रताप दराडे यांच्या मागदर्शनाखाली पोसई मोरे हे पुढील तपास करीत आहे .
याघटनेने रुग्णासह डॉक्टर मंडळीमध्ये देखील एकच खळबळ उडाली आहे .