शिवप्रहार न्युज - 'केस मागे घे' म्हणत श्रीरामपूर कोर्ट आवारात महिलेचा विनयभंग...
'केस मागे घे' म्हणत श्रीरामपूर कोर्ट आवारात महिलेचा विनयभंग...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज) - कोर्टात असलेली केस मागे घे म्हणत ,महिलेशी अश्लिल बोलत, तिच्या अंगावर धावून जात ,तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य श्रीरामपूर शहरात घडले आहे. याबाबत, २५ वर्षीय महिलेने पोलिसात फिर्याद दिली असून त्यात म्हटले आहे की, तारखेकरीता आपण श्रीरामपूर येथील कोर्टात गेलो असता दुपारी जेवणाच्या सुट्टीत कोर्ट आवारात झाडाखाली बसलेली असताना तेथे नानासाहेब लक्ष्मण राऊत रा. अशोकनगर फाटा आणि गोट्या खामकर, रा. निपाणीवडगाव व नाना आटोळे, रा.निपाणीवडगाव हे तिघे आले व नाना राऊत हा म्हणाला की, तू धंदा करून पैसे कमवते, तुझे रेट काय ? असे म्हणत तू माझ्याविरूद्धची कोर्टातील केस मागे घे, असे म्हणाला. तेव्हा आपण केस मागे घेणार नाही, असे म्हणाल्याने त्याने वाईट वाईट शिवीगाळ करत आपल्या अंगावर धाऊन येवून, अंगाला हात लावून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या फिर्यादीवरून पोलिसांनी नानासाहेब राऊत, गोट्या खामकर, नाना आटोळे यांच्याविरूद्ध श्रीरामपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.