शिवप्रहार न्युज - हिंदुस्थानातील श्रीरामांच्या नावाने पहिला असा “श्रीरामपूर जिल्हा” मागणीसाठी बेमुदत साखळी उपोषण आंदोलन सुरू…
हिंदुस्थानातील श्रीरामांच्या नावाने पहिला असा “श्रीरामपूर जिल्हा” मागणीसाठी बेमुदत साखळी उपोषण आंदोलन सुरू…
श्रीरामपूर -हिंदुस्थानातील श्रीरामांच्या नावाने पहिला असा “श्रीरामपूर जिल्हा” व्हावा या मुख्य मागणीसाठी श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे अध्यक्ष तथा शिर्डी संस्थानचे मा. विश्वस्त श्री. प्रताप नाना भोसले,यांच्या मार्गदर्शनाखाली व शिवप्रहारप्रमुख, माजी PSI श्री.सुरजभाई आगे यांच्या नेतृत्वाखाली आज शुक्रवार 16 ऑगस्ट पासून बेमुदत साखळी उपोषण आंदोलन सुरू करण्यात आले आहे. काल "15 ऑगस्ट" रोजी सरकारने श्रीरामपूर जिल्ह्याची घोषणा न केल्यामुळे हे आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
श्रीरामपूर जिल्हा कृती समिती सन 2014 पासून श्रीरामपूर जिल्हा मागणीसाठी कार्यरत असून शिवप्रहारही गेल्या काही वर्षांपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवस्मारकासह श्रीरामपूर जिल्हा मागणीकरता अतिशय आग्रहीपणे मागणी मांडत आहे.श्रीरामपूर जिल्हा कृती समिती व शिवप्रहारच्या माध्यमातून गेल्या वर्षी शहर व तालुक्यात जवळपास 75 ठिकाणी श्रीरामपूर जिल्हा निर्मितीसाठी जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात आले.तसेच यावर्षी जानेवारीमध्ये विराट मोर्चा श्रीरामपूर जिल्हा मागणीसाठी शहरात काढण्यात आला होता.मुंबई आझाद मैदान येथे 17 दिवस धरणे आंदोलन देखील करण्यात आले होते.सरकारसोबत अनेकदा पत्रव्यवहार देखील करण्यात आला आहे.तरी श्रीरामपूर जिल्हा निर्मितीसाठी सरकारकडून कृतीशील,ठोस असे पाऊल उचलले जात नाही.तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असल्याचे श्रीरामपूर जिल्हा कृती समिती व शिवप्रहारच्या वतीने यावेळी सांगण्यात आले.
श्रीरामपूर शहरातील बेलापूर रोड, जुने जयबाबा प्रेससमोर,बजरंगनगर येथे हे आंदोलन सुरु करण्यात आले आहे.