शिवप्रहार न्युज - मेंदूतील गाठ वितळण्याच्या इंजेक्शनने पॅरालिसीस पेशंट एका तासात बरा - डॉ. दिलीप शिरसाठ

शिवप्रहार न्युज - मेंदूतील गाठ वितळण्याच्या इंजेक्शनने पॅरालिसीस पेशंट एका तासात बरा - डॉ. दिलीप शिरसाठ

मेंदूतील गाठ वितळण्याच्या इंजेक्शनने पॅरालिसीस पेशंट एका तासात बरा - डॉ. दिलीप शिरसाठ

श्रीरामपुर ( शिवप्रहार न्यूज) येथील प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ.दिलीप शिरसाठ यांच्या हॉस्पिटलमध्ये पॅरालिसिस झालेला रुग्ण अत्याधुनिक उपचार पद्धतीने एका तासात बरा झाल्याची घटना नुकतीच घडल्याची माहिती रुग्णालयाचे प्रमुख डॉ.दिलीप शिरसाठ यांनी दिली.

       याविषयी अधिक माहिती देताना डॉ.दिलीप शिरसाठ यांनी सांगितले की, मुंबईहून ६९ वयाची व्यक्ती कामानिमित्त श्रीरामपूर येथे आले असता त्यांच्या डाव्या बाजूला त्रास सुरु झाला.रुग्णाच्या नातेवाईकांनी सदरच्या व्यक्तीला तातडीने शिरसाठ हॉस्पिटल मधे आणले.तेथे सदर पेशेंटच्या सर्व प्रकारच्या तपासण्या करून एम.आर.आय. केला असता रिपोर्टमधे रुग्णाच्या मेंदूत गाठ झालेली दिसत होती. डॉ.दिलीप शिरसाठ व डॉ.अक्षय शिरसाठ यांनी न्यूरोसर्जन डॉ.नहुष पाटील,नाशिक यांच्याशी सल्ला मसलत करून अत्याधुनिक उपचार पद्धतीची माहिती घेतली.डॉ.नहुष पाटील तातडीने श्रीरामपूर येथे आले असता डॉ.दिलीप शिरसाठ व डॉ.अक्षय शिरसाठ यांनी चर्चेद्वारे सदरच्या रुग्णावर अत्याधुनिक उपचार पद्धतीचे इंजेक्शन देण्याचा निर्णय घेतला.त्यानुसार पेशेंटच्या मेंदूच्या गाठेमध्ये इंजेक्शन दिले.त्यानंतर एका तासात बेशुद्ध पेशेंट शुद्धीवर येऊन हालचाल करू लागला, बोलू लागला.याचा उपस्थित नातेवाईकांबरोबर सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

      श्रीरामपूर येथील शिरसाठ हॉस्पिटलमधे प्रथमच ही उपचार पध्दती यशस्वी पार पडली व पेशेंट सुखरूप मुंबईला त्याच्या घरी गेला आहे.

पेशंट च्या नातेवाईकांनी डॉ.दिलीप शिरसाठ व डॉ.अक्षय शिरसाठ व सर्व स्टाफचे आभार मानून अभिनंदन केले आहे.