शिवप्रहार न्युज - लहान मुलाचा बिबट्याने घेतला बळी! चितळीत पालकांत प्रचंड खळबळ!!
लहान मुलाचा बिबट्याने घेतला बळी! चितळीत पालकांत प्रचंड खळबळ!!
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज) श्रीरामपूर तालुका पोलीस हद्दीत येणाऱ्या चितळी परिसरात काल रविवारी रात्री बिबट्याने एका ०३ वर्षाच्या लहान मुलाच्या नरडीचा घोट घेवून बळी घेतला . याप्रकाराने चितळीसह श्रीरामपूर व राहाता तालुक्यात एकच खळबळ उडाली असून पालक-नागरीकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने आता मुलाचा बळी गेल्यावर पिंजरे लावण्याची धावपळ सुरु केली आहे.
अनेक वेळा वन विभागाला कळवूनही ते दुर्लक्ष करतात अशा नागरीकांनी तक्रारी केल्या आहेत . मयत मुलाचे नाव प्रथमेश मयुर वाघ असे असून त्याचे आई व नातेवाईकांनी घटनेनंतर प्रचंड हंबरडा फोडला आहे . मागे लोणी परिसरात बिबट्याने लहान मुलाचा बळी घेतला होता,ऐनतपूर -वळदगाव शिवारात गायकवाड या तरुण शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला होता . याभागात पिंजरा लावा अशी मागणी आहे तिच्याकडे वन विभागाने दुर्लक्ष केले अशा तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या.
वनविभागाचा बेजबाबदारपणा आणखी किती बळी घेणार ? असा संतप्त सवाल नागरीक विचारत असून निष्पाप लहान मुलगा मेल्यावर पिंजरे लावतात! मागणी केल्यावर का नाही ? या प्रश्नाचे वन विभाग वरिष्ठांनी उत्तर द्यावे.अन्यथा आता जनता तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार आहे.वन विभाग पिंजरे का वाढवत नाही हा संशोधनाचा विषय आहे!