शिवप्रहार न्युज - श्रीरामपूरचे पोरं नगरमध्ये कसे काम करतात ते बघतोच असे म्हणत मारहाण…

शिवप्रहार न्युज -  श्रीरामपूरचे पोरं नगरमध्ये कसे काम करतात ते बघतोच असे म्हणत मारहाण…

श्रीरामपूरचे पोरं नगरमध्ये कसे काम करतात ते बघतोच असे म्हणत मारहाण…

नगर(प्रतिनिधी) – श्रीरामपूरचे मुलं नगरमध्ये कसे काम करतात ते बघतोच अशी धमकी देत तिघांनी नगर- श्रीरामपूर रेल्वेमध्ये भेळ विक्री करणाऱ्या श्रीरामपूरच्या तरुणाला मारहाण केली. सागर संजय तोरणे (वय २९ रा. पढेगाव, ता. श्रीरामपूर) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. नुकतेच नगर रेल्वे स्टेशन जवळ ही घटना घडली आहे. या प्रकरणी तोरणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संकेत साळवे उर्फ बंटी (रा. पंचशिलनगर, नगर) व त्याच्या सोबतच्या दोघा अनोळखी विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला 

आहे. 

        अधिक माहिती अशी कि,तोरणे हे नेहमीप्रमाणे श्रीरामपूर येथून रेल्वेमध्ये भेळ विक्रीसाठी आले होते. त्यांनी नगर रेल्वे स्टेशन समोरील हॉटेलमध्ये जेवण केले व परत रेल्वे स्टेशनकडे जात असताना संकेत व त्याच्या सोबतच्या दोघांनी त्यांना बंधुप्रेम हॉटेलजवळ अडविले. तू कोणासाठी काम करतो असे विचारले असता तोरणे यांनी त्यांच्या मालकाचे नाव सांगितले. त्यांनी तोरणे यांना शिवीगाळ करून लाकडी दांडक्याने मारहाण केली. तसेच श्रीरामपूरचे मुलं/पोरं नगर मध्ये कसे काम करतात ते बघतोच असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.