शिवप्रहार न्युज - गोंधवणी येथील अवैध गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा;Dy.s.p डॉ. बसवराज शिवपुजे व त्यांच्या पथकाची कारवाई…

शिवप्रहार न्युज -  गोंधवणी येथील अवैध गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा;Dy.s.p डॉ. बसवराज शिवपुजे व त्यांच्या पथकाची कारवाई…

गोंधवणी येथील अवैध गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा;Dy.s.p डॉ. बसवराज शिवपुजे व त्यांच्या पथकाची कारवाई…

श्रीरामपूर- 

आज गुरुवार दि. 17/10/2024रोजी Dy.s.p. डॉ. बसवराज शिवपुजे यांना गुप्त बातमीदार मार्फत गोंधवणी येथे गावठी हातभट्टी दारू अड्डे व हातभट्टी दारू तयार करत आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने त्यांनी आपले पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सदर ठिकाणी जाऊन छापा टाकण्याचे आदेश दिल्याने पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी गोंधवणी येथे परिसरातील सर्व गावठी हातभट्टी दारू अड्ड्यावर छापा टाकून गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन,तयार गावठी हातभट्टी दारू यांचा नाश करण्यात आला.

          आरोपी. क्र.)1) अनिल मुकुंदा फुलारे रा. गोंधवणी 24,500/- रु. कि.चे 500 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.) 2,500/- रू किमतीची 25 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची किं. अं.)आरोपी. क्र.) 2. अर्जुन दौलत फुलारे रा. गोंधवणी वॉर्ड नंबर 1 श्रीरामपूर 22,750/- रु. कि.चे 325 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.)

2,000/- रू किमतीची 20 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची (किं. अं.)आरोपी. क्र.) 3. संदीप सुरेश शिंदे रा. गोंधवणी 28,750/- रु. कि.चे 410 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.)25,00/- रू किमतीची 25 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची (किं. अं.) आरोपी. क्र.) 4. अशोक सिताराम गायकवाड रा. गोंधवणी 19,250/- रु. कि.चे 275 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.)2,500/- रू किमतीची 25 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची (किं. अं.)आरोपी. क्र.) 5. ऋतिक शिवाजी गायकवाड रा. गोंधवणी 22,750/- रु. कि.चे 225 लिटर गावठी हातभट्टी दारू तयार करण्याचे कच्चे रसायन ( किं.अं.)2,000/- रू किमतीची 30 लिटर तयार गावठी हातभट्टी दारू( आंबट उग्र वासाची (किं. अं.)

 एकूण 1,29,500/-/- रुपये

        वरील वर्णनाचा व किमतीचा प्रोहिबिशन गुन्ह्याचा माल आरोपींचे ताब्यातून जप्त करून जागीच नाश केला असून सर्व आरोपींविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे, मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 ( फ) (क) (ड ) (ई) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

     आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या या कारवाईमुळे गोंधवणी परिसरातील अवैध धंदे चालकांचे धाबे दणाणले असून सदर कारवाई चे गोंधवणी येथील महिलांनी Dy.s.p. डॉ. बसवराज शिवपुजे व त्यांचे पथकाचे कौतुक करून आभार व्यक्त केले

       सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक मा. वैभव कलुबर्मे, यांचे मार्गदर्शनाखाली Dy.s.p डॉ. बसवराज शिवपुजे, ,H.c. सुरेश औटी, पो. कॉ. नितीन शिरसाठ, म.पो.कॉ. भाग्यश्री गोरे,म.पो.कॉ अर्चना अहिरे म.पो.कॉ. आरती जाधव तसेच R.C.P. पथक आदींनी केली