शिवप्रहार न्युज - माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे यांचे निधन...
माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे यांचे निधन...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- श्रीरामपूर शहराचे माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे यांचे आज दिनांक ०४ डिसेंबर २०२४ रोजी अहिल्यानगर येथे एका खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले. काही दिवसांपासून त्यांच्यावर या खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार चालू होते, परंतु उपचारादरम्यान आज त्यांची प्राणज्योत मालवली. माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे हे बाबासाहेब या नावाने देखील परिचित होते. तसेच आज त्यांचा जन्मदिवस देखील होता. त्यांच्या जन्मदिनीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या या दुःखद निधनामुळे त्यांच्या मित्रपरिवार व नातेवाईकांमध्ये शोक व्यक्त केला जात आहे.