शिवप्रहार न्युज - श्रीरामपूरच्या व्यापाऱ्याला १। कोटीला फसवले! चेअरमन पाचपुतेवर गुन्हा दाखल!!
श्रीरामपूरच्या व्यापाऱ्याला १। कोटीला फसवले! चेअरमन पाचपुतेवर गुन्हा दाखल!!
श्रीरामपूर ( शिवप्रहार न्युज ) श्रीरामपूरचे अनेक व्यापारी जिल्हयात व राज्यात साखर कारखान्यांना मालपुरवीणे खरेदी - विक्रीचे व्यवसाय करतात.आता श्रीरामपूरातील साखर व तेल व्यापारी राजेश रुपचंद कासलीवाल,रा.श्रीरामपूर यांची १ कोटी २४ लाख ७७३९० रुपयांची फसवणुक झाली आहे तशी फिर्याद काल राजेश कासलीवाल यांनी श्रीरामपूर शहर पोलीसात दिल्यावरून आरोपी साजन सदाशिव पाचपुते,चेअरमन साजन शुगर प्रा . ली . काष्टी श्रीगोंदा जिल्हा ,अहिल्यादेवीनगर व संचालक मंडळ यांच्या विरुद्ध भा . न्या . सहि . २०२३ चे कलन ३१८ .(४ ) ३१६(५) ३१६(२ )३ (५) प्रमाणे फसवणुक झाल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
सविस्तर माहीती अशी की,फिर्यादीत म्हटले आहे साखर खरेदीचा करार करून ९३ लाख रुपये घेवून साखर न देता फसवणुक करून करार भंग केला. पैसे परत मागीतले असता ३४ लाख ६२ हजाराचा भिमालयनगर,पुणे येथील फ्लॅट नावे केला. राहीलेली रक्कम ५८लाख ३८ हजार व करारात ठरल्या प्रमाणे६६लाख ३९ हजार ३९० अशी एकूण १।कोटीची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे .
साखर व्यापाऱ्याच्या फिर्यादीवरून चेअरमन पाचपुते व संचालक यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे . आरोपी हा माजी मंत्र्याचा पुतण्या असल्याचे समजते .