शिवप्रहार न्युज - राहुरीतील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या शेख आणि मुलीला पळवून नेणाऱ्या पठाणला एलसीबीने पकडले...

शिवप्रहार न्युज -  राहुरीतील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या शेख आणि मुलीला पळवून नेणाऱ्या पठाणला एलसीबीने पकडले...

राहुरीतील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या शेख आणि मुलीला पळवून नेणाऱ्या पठाणला एलसीबीने पकडले...

   राहुरी/कोपरगाव (शिवप्रहार न्युज)- राहुरी येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करुन जातीवाचक शिवीगाळ केले बाबत दिनांक 4/8/23 रोजी राहुरी पोलीस स्टेशन गु.र.नं.848/23 भादविक 354, 354 (ड), 506 सह पोक्सो का.क. 8, 12 व अजाजकाक. 3 (1) (आर), 3 (1) (डब्लु) (1) गुन्हा दाखल होता. 

तसेच कोपरगांव येथील अल्पवयीन मुलीस अनोळखी आरोपीने अज्ञात कारणासाठी फुस लावुन पळवुन नेले बाबत दिनांक 5/8/23 रोजी कोपरगांव शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. 372/23 भादविक 363 प्रमाणे गुन्हा दाखल होता.

      सदर दोन्ही घटना अत्यंत संवेदनशील असल्याने श्री.राकेश ओला, पोलीस अधीक्षक, नगर यांनी पोनि.दिनेश आहेर यांना स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन पिडीत अल्पवयीन मुलीचा व वरील दोन्ही गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.

      नमुद आदेशान्वये पोनि.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/तुषार धाकराव, पोहेकॉ/बबन मखरे, शरद बुधवंत, पोना/रविंद्र कर्डीले, संतोष लोढे, संदीप दरदंले, सचिन आडबल, फुरकान शेख, पोकॉ/बाळू खेडकर, रणजीत जाधव, शिवाजी ढाकणे, रोहित मिसाळ, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, मपोना/भाग्यश्री भिटे, मपोकॉ/ज्योती शिंदे, चापोहेकॉ/चंद्रकांत कुसळकर व चापोकॉ/अरुण मोरे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांची दोन वेगवेगळी पथके नेमून पिडीत अल्पवयीन मुलगी व दोन्ही आरोपींचा शोध घेणे बाबत सुचना देवुन पथकास तात्काळ रवाना केले. 

    हे पथक प्रथम राहुरी येथे दाखल गुन्ह्यातील आरोपी शाहनवाज शेख याचा शोध घेत असताना तो बीड येथे असलेबाबत माहिती मिळाल्याने पथकाने स्थागुशा बीड येथे नेमणुकीस असलेले पोना.मनोज वाघ यांना मदतीस घेवुन आरोपी बाबत माहिती घेवून आरोपी शाहनवाज असिफ शेख वय 21, रा. वांबोरी, ता. राहुरी हा मिळुन आल्याने त्यास ताब्यात घेवुन पुढील तपास कामी राहुरी पोलीस स्टेशन येथे हजर केले. दरम्यान स्थानिक गुन्हे शाखेतील एक पथक कोपरगांव शहर येथे दाखल गुन्ह्यातील अनोळखी आरोपीचा शोध घेत असताना गुन्ह्यातील पिडीत अल्पवयीन मुलगी व आरोपी यांचा प्रथम पुणे, लोणावळा येथे शोध घेतला.परंतु ते नवी मुंबई येथील वाशी या ठिकाणी असले बाबत माहिती मिळताच पथकाने वाशी पोलीस स्टेशनचे पोसई.निलेश बारसे यांना मदतीस घेवुन पिडीत व आरोपीचे वास्तव्याबाबत माहिती प्राप्त करुन पिडीत अल्पवयीन मुलगी व आरोपी तौफिक मिटु पठाण, रा. बोधेगांव, ता.शेवगांव हे मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन पुढील तपासकामी कोपरगांव शहर पोलीस स्टेशन येथे हजर केले.

     सदरची कारवाई श्री.राकेश ओला, पोलीस अधीक्षक, नगर, श्रीमती. स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर, डॉ.बसवराज शिवपुजे, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग व श्री.संदीप मिटके, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.