शिवप्रहार न्युज - छत्रपतींच्या घराण्याला मंत्रिपद मिळावे यासाठी होमगार्डचे टॉवरवरचढून आंदोलन…
छत्रपतींच्या घराण्याला मंत्रिपद मिळावे यासाठी होमगार्डचे टॉवरवरचढून आंदोलन…
जालना- जालना जिल्ह्यामध्ये कार्यरत असलेले होमगार्ड सदाशिव ढाकणे यांनी आज बुधवारी सकाळपासुन छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेल्या उदयनराजे किंवा शिवेंद्रराजे यांना उद्या होणाऱ्या मंत्रीपदाच्या शपथविधी मध्ये मंत्री म्हणून स्थान मिळावे या मागणी करता टॉवरवर चढत आंदोलन केले.
होमगार्ड सदाशिव ढाकणे हे जालना जिल्ह्यातील हसनाबाद उर्फ प्रतापपूर पोलीस स्टेशनच्या अंतर्गत कार्यरत असल्याची माहिती मिळत आहे.तसेच या होमगार्डने छत्रपतींच्या घराण्याला मंत्रिपद मिळावे यासाठी राजीनामा देखील दिल्याची माहिती समजत आहे.