शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात 28 वैध उमेदवारी अर्ज…

शिवप्रहार न्युज -  श्रीरामपुरात 28 वैध उमेदवारी अर्ज…

श्रीरामपुरात 28 वैध उमेदवारी अर्ज…

श्रीरामपूर- श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघासाठी दाखल करण्यात आलेल्या अर्जापैकी 28 उमेदवारी अर्ज हे वैधरित्या दाखल झाले आहे. या 28 उमेदवारी अर्जामध्ये शिवसेना शिंदे गटाकडून भाऊसाहेब मल्हारी कांबळे, काँग्रेसकडून हेमंत ओगले,राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाकडून लहू कानडे, मनसेकडून राजाभाऊ कापसे,अपक्ष सदाशिव लोखंडे तसेच इतर सर्व मिळून 28 उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आले आहे. 

         दाखल झालेल्या सर्व अर्जांची प्रशासनाकडून छाननी करण्यात आल्यानंतर ही माहिती समोर आली आहे.दरम्यान 04 नोव्हेंबर 2024 रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची मुदत दिनांक आहे.त्यानंतर श्रीरामपूर विधानसभा संघातील उमेदवारांबाबत चित्र स्पष्ट होईल.