शिवप्रहार न्युज - भव्य प्रचार रॅलीने देवळाली प्रवरा,राहुरी फॅक्टरी परिसरात 'मनसे'चा बोलबाला...

शिवप्रहार न्युज -  भव्य प्रचार रॅलीने देवळाली प्रवरा,राहुरी फॅक्टरी परिसरात 'मनसे'चा बोलबाला...

भव्य प्रचार रॅलीने देवळाली प्रवरा,राहुरी फॅक्टरी परिसरात 'मनसे'चा बोलबाला...

श्रीरामपूर (प्रतिनिधी ) श्रीरामपूर विधानसभा मतदार संघातील मनसेचे उमेदवार राजाभाऊ कापसे यांच्या प्रचाराची रणधुमाळी चांगलीच वाढली आहे. खेडेगावात मनसेचे उमेदवार राजाभाऊ कापसे यांच्या प्रचाराचा ताफा प्रत्येक गल्ली व घराघरापर्यंत पोहचला आहे.याच दरम्यान श्रीरामपूर मतदार संघांत असलेल्या राहुरी तालुक्यातील 32 गावात देखील मनसेचे 'रेल्वे इंजिन' आता चांगलेच धाव घेऊ लागले आहे. राहुरी फॅक्टरी ते देवळाली प्रवरा दरम्यान मनसेचे उमेदवार राजाभाऊ कापसे यांची भव्य प्रचार रॅली काढण्यात आली होती.राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून या रॅलीस सुरुवात करण्यात आली. या भव्य रॅलीत राहुरी फॅक्टरी देवळाली प्रवरा परिसरातील सुमारे 150 दुचाकी 40 चार चाकी वाहनासह शेकडो समर्थक सहभागी झाले होते. या रॅली दरम्यान ओपन जीप मध्ये उभे राहून मनसेचे उमेदवार राजाभाऊ कापसे यांनी नागरिकांना नमस्कार घालत मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी विधानसभेत पाठविण्याची मागणी केली.या भव्य-दिव्य प्रचार फेरी रॅलीने परिसरात उमेदवार राजाभाऊ कापसे यांच्या मनसेच्या रेल्वे इंजिन चा चांगलाच बोलबाला सुरु आहे. 

       राहुरी फॅक्टरी परिसर ते देवळाली प्रवराचा मार्केट भागातून रॅली झाल्यानंतर देवळाली प्रवरा येथे कॉर्नर सभा घेण्यात आली.यावेळी बोलताना मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे म्हणाले की राजाभाऊ कापसे हे स्थानिक उमेदवार आहे.कुठलेही विकास कामांची व अडीअडचणी च्या काळात अहोरात्र उभा राहणारा आपला हक्काचा उमेदवार म्हणून राजाभाऊ कापसे यांना संधी देण्याची मागणी शिंदे यांनी केली पुढील भाषणात बोलताना उमेदवार राजाभाऊ कापसे म्हणाले की सर्वसामान्य बेरोजगार तरुण नोकरीं पासून वंचित आहे,मोठया नेत्यांचे मुले आज उच्च पदावर आहे,उच्च शिक्षण घेताना गोरगरीब मुलांना आर्थिक समस्याला सामोरे जावे लागते जर आपण संधी दिली तर विकास कामासोबतच शासनाच्या बार्टी मधून आयएएस अधिकारी पदवी शिक्षणासाठी सवलतीत मंजुरी करून घेऊन आपल्या भागातून शेकडो आयएएस अधिकारी तयार करणार असल्याचे यावेळी राजाभाऊ कापसे यांनी सांगितले.

      यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे,सामाजिक कार्यकर्ते प्रदीप थोरात (बॉस),अशोक मुसमाडे ऍंथोनी शेळके,विकी कापसे,प्रकाश कोळसे, संजय बर्डे, साईनाथ बर्डे, प्रमोद बर्डे,मनसेचे डॉ संजय नवथर सतीश कुदळे, अमोल साबणे विलास पटणी, नितीन जाधव, निलेश सोनवणे,सुनील रुपटक्के, राकेश कापसे, रॉकी लोंढे,

आदिसह मनसे पदाधिकारी, हितचिंतक व कार्यकर्ते ग्रामस्थ उपस्थित होते.