शिवप्रहार न्युज - शेतकऱ्यांची कामे मा.आ.भाऊसाहेब कांबळेंकडुन करून घेण्यासाठी त्यांना पाठिंबा-शेतकरी संघटना
शेतकऱ्यांची कामे मा.आ.भाऊसाहेब कांबळेंकडुन करून घेण्यासाठी त्यांना पाठिंबा-शेतकरी संघटना
श्रीरामपूर - श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे धनुष्यबाण चिन्हाचे उमेदवार मा.आमदार भाऊसाहेब कांबळे यांना शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांची कामे त्यांच्याकडून विधानसभेत करून घेण्यासाठी पाठिंबा दिला असल्याचे स्पष्ट केले आहे.शेतकरी संघटना भाऊसाहेब कांबळे यांच्या प्रचारात पूर्णपणे सक्रिय झाली आहे.
रघुनाथ दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखालील शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष अजित काळे पाटील तसेच अनिल औताडे,युवराज पाटील,नाईक पाटील यांनी हे स्पष्ट केले आहे.शेतकऱ्यांचे विविध प्रश्न भाऊसाहेब कांबळे हे पुन्हा आमदार झाल्यानंतर त्यांच्या माध्यमातून विधानसभेत सोडवले जातील आणि शेतकऱ्यांचे जीवन सुखी करण्याचा प्रयत्न देखील केला जाईल असे शेतकरी संघटनेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.