शिवप्रहार न्युज - ॲपे रिक्षामधुन अवैध दारू वाहतुक करणारे 2 आरोपीकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त....

शिवप्रहार न्युज -  ॲपे रिक्षामधुन अवैध दारू वाहतुक करणारे 2 आरोपीकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त....

ॲपे रिक्षामधुन अवैध दारू वाहतुक करणारे 2 आरोपीकडून लाखोंचा मुद्देमाल जप्त....

कोपरगाव-विधानसभा निवडणुकीचे अनुषंगाने मा. श्री राकेश ओला, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री दिनेश आहेर यांना जिल्ह्यामध्ये विनापरवाना बेकायदा दारु विक्री करणारे इसमांविरुध्द कारवाई करणेबाबत आदेश दिलेले आहेत. 

 नमुद आदेशाप्रमाणे पोनि श्री दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील पोलीस अंमलदार गणेश भिंगारदे, रणजीत जाधव, विशाल तनपुरे व रमीजराजा आत्तार अशांचे पथक तयार करून कोपरगाव शहरामध्ये विनापरवाना बेकायदा दारु विक्री करणारे इसमांची माहिती काढुन त्यांचेविरुध्द कारवाई करणेबाबत सुचना देऊन पथक रवाना केले होते. 

तपास पथक दिनांक 11/11/2024 रोजी कोपरगाव शहरामध्ये पेट्रोलिंग करत असताना पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कोपरगाव शहरामध्ये दोन इसम विना क्रमांकाची ॲक्टीवा मोपेड व ॲपे रिक्षा दारू विक्री करण्यासाठी वाहतुक करणार आहेत. तपास पथकाने मिळालेल्या माहितीवरून वाहनाचा शोध घेत असताना के जी एस कॉलेज रोड, गोदावरी नदीचे पुलावर कोपरगाव येथे संशयीत वाहने मिळून आल्याने, वाहनास थांबवून त्यावरील इसमांना त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) विशाल रमेश पाटील, वय 23, रा.निघोज निमगाव, ता.राहाता, जि.अहिल्यानगर व 2) गौतम वाल्मिक जगताप, वय 20, रा.निघोज निमगाव, ता.राहाता, जि.अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. पंचासमक्ष त्यांचे ताब्यातून 3,43,120/- रूपये किंमतीचा मुद्देमाल त्यात देशी विदेशी दारू व ॲपे रिक्षा व ॲक्टीव्हा मोपेड असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.

        नमूद आरोपीविरूध्द कोपरगाव शहर पोलीस स्टेशन गुरनं 312/2024 महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हयाचा पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हे करीत आहेत. 

       सदर कारवाई मा.श्री. राकेश ओला,पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, मा.श्री. वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर, व मा. श्री. शिरीष वमने, उपविभागीय पोलीस अधिकारी, शिर्डी विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.