शिवप्रहार न्युज - भेर्डापूरला पाण्यावरून चुलता-चुलतीला मारहाण...

शिवप्रहार न्युज -  भेर्डापूरला पाण्यावरून चुलता-चुलतीला मारहाण...

भेर्डापूरला पाण्यावरून चुलता-चुलतीला मारहाण...

    श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- पाण्याच्या किरकोळ कारणावरून चुलतीला तसेच चुलत्याला मारहाण करून जखमी करण्याचा प्रकार तालुक्यातील भेर्डापूर परिसरात घडला आहे. याबाबत अरूण भाऊसाहेब कवडे, वय-५५, रा. भेर्डापूर यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. 

     त्यात म्हटले आहे की,आमच्या शेजारी पुतण्या रविंद्र राहतो. आमच्यात सामायिक विहीर असून त्यातील पाण्यावरून वाद होत असतात. दोन दिवसांपूर्वी दुपारी पाण्याच्या किरकोळ कारणावरून पुतण्या रविंद्र व त्याची आई नंदा हे शिवीगाळ करू लागले. तेव्हा त्यांना समजावून सांगत असताना रविंद्र याने हातातील लोखंडी वस्तूने माझ्या पत्नीच्या डोक्यात जोरात मारून तिला जखमी केले. आपण मध्ये पडलो असता आपल्यालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करत जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

        याप्रकरणी रविंद्र संजय कवडे, नंदा संजय कवडे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस करीत आहेत.