शिवप्रहार न्युज - चिडलेल्या अल्पवयीन मुलीच्या पित्याने आरोपीचे श्रीरामपुरातील हॉटेल फोडले...

चिडलेल्या अल्पवयीन मुलीच्या पित्याने आरोपीचे श्रीरामपुरातील हॉटेल फोडले...
श्रीरामपूर -याबाबत अघिक माहिती अशी की,श्रीरामपूर शहरातील एका भागातील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला फसवून,लग्नाच्या भूल-थापा देऊन तिला सोनईला जातांना उंबरे,ता.राहुरी येथील हॅाटेल साई व्यंकटेश लॅाज येथे नेवुन तिच्यावर बलात्कार करणारा आरोपी स्वप्निल राजेंद्र जैन,रा.वार्ड .०७,श्रीरामपूर याचे "चायवाला" हॅाटेल चिडलेल्या मुलीच्या वडीलांनी आज फोडले.
आरोपी स्वप्निल जैन हा शहरातील एका गुन्हेगारी टोळीशी संबंधित असून तो त्यामार्फत मुलीच्या वडिलांना गेल्या काही दिवसांपासून धमकावत होता.पोलिसांत तक्रार करु नको,मर्डर करीन,मुलीचे आयुष्य बरबाद करु अशा सततच्या धमक्या स्वप्नील जैन व हि गुन्हेगारी टोळी मुलीच्या वडिलांना देत होते.शेवटी सततच्या धमक्यांना वैतागलेल्या मुलीच्या पित्याने आज रुद्रावतार धारण करत,चिडून हातात दांडा घेवुन जात ह्या आरोपीचे श्रीरामपूर शहरातील छ.शिवाजी महाराज रोडवरील “हॅाटेल चायवाला” येथे तोडफोड केली.
दरम्यान ह्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणारा आरोपी स्वप्निल राजेंद्र जैन याच्यावर काल रविवारी दि.१६ फेब्रुवारी रोजी बलात्काराचा व पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे.या गुन्ह्याचा तपास अप्पर पोलीस अधीक्षक श्री.वैभव कलुबर्मे, डीवायएसपी डॅा.श्री.बसवराज शिवपुजे,शहर पीआय नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय समाधान सोळंके हे करीत आहेत.
तरी अनेकांनी मुलीच्या वडिलांनी केलेल्या ह्या कृतीचे
स्वागत केले आहे.