शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरातुन ०२ अल्पवयीन मुलींना पळवले…

शिवप्रहार न्यूज- श्रीरामपुरातुन ०२ अल्पवयीन मुलींना पळवले…

श्रीरामपुरातुन ०२ अल्पवयीन मुलींना पळवले…

श्रीरामपूर(शिवप्रहार न्युज)-श्रीरामपूर शहरातून दोन अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्याचा प्रकार घडला आहे. पहिली अल्पवयीन मुलगी ही वार्ड नं.2, गुलशन चौक परिसरात राहणारी आहे. दि.13 डिसेंबर रोजी 12 च्या सुमारास सदर मुलगी शाळेतून घरी आली नाही म्हणून तीची चौकशी केली असता तिला कोणीतरी फूस लावून पळवून नेल्याचे समजल्यानंतर मुलीच्या वडीलांच्या फिर्यादीवरून अज्ञात व्यक्तीविरोधात भादंवि कलम 363 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

        दुसरी घटना श्रीरामपूर शहरातील सूतगिरणीरोड परिसरात घडली आहे. यातील 15 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमीष दाखवून दि.11 डिसेंबर रोजी पहाटे 2 ते 5 च्या सुमारास राहत्या घरातून आरोपी चेतन भाऊलाल कासवत, वय-19, रा.निलकंठ गार्डन बिल्डिंगसमोर, पुर्णवादनगर, वार्ड नं.7, श्रीरामपूर याने पळवून नेल्याचे सदर अल्पवयीन मुलीच्या वडीलांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी आरोपी चेतन भाऊलाल कासवत याच्याविरोधात श्रीरामपूर पोलिसात भादंवि कलम 366, 366अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.      

       पुढील तपास पोनि.हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पेालीस करीत आहेत.