शिवप्रहार न्युज - शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर खंडाळा,भेर्डापूरला शिवभक्तांनी बसवले शिवस्मारक...

शिवप्रहार न्युज - शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर खंडाळा,भेर्डापूरला शिवभक्तांनी बसवले शिवस्मारक...

शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर खंडाळा,भेर्डापूरला शिवभक्तांनी बसवले शिवस्मारक...

श्रीरामपूर - श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा व भेर्डापूर या गावांमध्ये शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर गावातील कट्टर शिवभक्तांनी एकत्र येत युगप्रवर्तक, युगपुरुष,छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक स्थापन केले आहे. 

         दोन्ही गावातील शिवभक्तांनी उद्या असलेल्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर हे स्मारक स्थापन केल्याने दोन्ही गावामध्ये सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

       दरम्यान भेर्डापूर मधील स्मारक हे प्रशासनाच्या सूचनेनुसार व राजकीय विषयामुळे तात्पुरते झाकण्यात आल्याची माहिती कळत आहे.