शिवप्रहार न्युज - ममदापूर कत्तलखान्यावर मोठी कारवाई;15 गोवंशीय जनावरांची सुटका,1200 किलो गोमांस जप्त...

ममदापूर कत्तलखान्यावर मोठी कारवाई;15 गोवंशीय जनावरांची सुटका,1200 किलो गोमांस जप्त...
लोणी/राहता- याबाबत अधिक माहिती अशी की,श्री.राकेश ओला, पोलीस अधिक्षक, अहिल्यानगर यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांना जिल्हयातील अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्याचे आदेश दिल्यानुसार पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखा व तपास पथकातील सपोनि/हेमंत थोरात व पोलीस अंमलदार गणेश लोंढे, संतोष लोढे, बिरप्पा करमल,विश्वास बेरड, हृदय घोडके, बाळासाहेब नागरगोजे, अशोक लिपणे, संदीप दरंदले, विजय ठोंबरे, शिवाजी ढाकणे, विशाल तनपुरे, रमीजराजा आत्तार, प्रमोद जाधव, जालींदर माने व महादेव भांड अशांचे पथक तयार करुन कारवाई करणेबाबत आदेशित केले.
पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, ममदापूर, ता.राहाता गावामध्ये मुंतजीर मुनीर कुरेशी, रा.ममदापूर, ता.राहाता हा काही इसमांसह गोवंशीय जनावरे कत्तल करण्याचे उद्देशाने निदर्यतेने विना चारा पाण्याचे डांबुन ठेवलेले आहेत. तपास पथकाने मिळालेल्या माहितीवरून पंचासमक्ष ममदापूर, ता.राहाता, जि.अहिल्यानगर येथे जाऊन खात्री केली असता मुंतजिर मुनीर कुरेशी याचे राहते घराचे बाजुला व मोकळया जागेत गोवंश जातीची जिवंत जनावरे निदर्यतेने डांबुन ठेवलेले दिसुन आले.तसेच मुंतजिर मुनीर कुरेशी याचे घरामध्ये काही इसम गोवंश जातीचे जनावरांची कत्तल करत असताना मिळून आल्याने पथकाने घटनाठिकाणावरून 1) मुंतजिर मुनीर कुरेशी, वय 23, 2) कैफ महेमुद खान, वय 18, रा.सोनारगल्ली, चाळीसगाव, जि.जळगाव, हल्ली रा.ममदापूर, ता.राहाता 3) अरबाज अजिज कुरेशी, वय 27, 4) हुजेब रज्जाक कुरेशी, वय 20, 5) जावेद मुसा पठाण, वय 31, अ.क्र.1, 3, 4 व 5 रा.ममदापूर, ता.राहाता, जि.अहिल्यानगर अशांना ताब्यात घेतले.
पथकाने पंचासमक्ष घटनाठिकाणावरून 3,50,000/- रू किं.त्यात 7 गायी, 1,50,000/- रू किं.त्यात 5 गोवंश जातीचे कालवडी, 60,000/- रू किं.त्यात 3 गोवंश जातीचे वासरे व 3,60,000/- रू किं.त्यात 1200 किलो गोमांस असा एकुण 9,20,000/-रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे.ताब्यातील आरोपी मुद्देमालासह लोणी पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले आहेत.आरोपीविरूध्द लोणी पोलीस स्टेशन गुरनं 229/2025 बीएनएस कलम 271, 325, 3 (5) सह महाराष्ट्र पशु संरक्षण कायदा कलम 5 (अ) (ब) (क), 9 सह प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याचा कायदा कलम 3 ,11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन गुन्हयांचा पुढील तपास लोणी पोलीस स्टेशन हे करीत आहेत.