शिवप्रहार न्यूज - बेवारस गाईवर अंत्यसंस्कार, खंडाळ्यातील गोमाता रक्षक युवकांचा पुढाकार.

शिवप्रहार न्यूज - बेवारस गाईवर अंत्यसंस्कार, खंडाळ्यातील गोमाता रक्षक युवकांचा पुढाकार.

बेवारस गाईवर अंत्यसंस्कार, खंडाळ्यातील गोमाता रक्षक युवकांचा पुढाकार.

श्रीरामपूर(प्रतिनिधी)

हिंदू धर्म शास्त्रानुसार गाईला अत्यंत पवित्र आणि पूजनिय मानले गेले आहे. सर्व पौराणिक शास्त्र परंपरेत वेद – पुराण – उपनिषदांमध्ये तसेच इतर अनेक धर्मग्रंथांमध्ये गोमातेचे व तिच्या पूजनाचे वर्णन व महत्व पदोपदी केलेले आपल्याला आढळून येते.

याच गोमातेला काही व्यक्तींनी खंडाळा येथील एमआयडीसी मध्ये पाय बांधून तसेच मृत अवस्थेत बेवारस सोडून गेले.या गोष्टीची माहिती मिळतात खंडाळा गावातील गोमाता रक्षक युवकांनी तात्परतेने रात्रीच्या वेळी जेसीपी उपलब्ध करून गोमातेवर अंत्यसंस्कार करण्यात आले.गाईच्या दुधापासून ताक,दही,लोणी,चीझ,साय,पनीर तसेच इतरही पदार्थ बनतात व त्याचा आपण सर्वजण आनंद घेतो. पण आपण त्या गौ मातेचा मृत्यू झाल्यानंतर तिचा अंत्यविधी करत नाही तिला बेवारसपणे सोडून देतात. यानिमित्ताने आपल्या सर्वांना आवाहन करण्यात येते की आपण मृत गोमातेला कुठेही टाकून न देता गौ मातेचा आदरपूर्वक अंत्यसंस्कार करु या..