शिवप्रहार न्युज - ओव्हरब्रिजजवळ वार्ड नं.०७ मधील तरूणाचा मृतदेह आढळला… 

शिवप्रहार न्युज -  ओव्हरब्रिजजवळ वार्ड नं.०७ मधील तरूणाचा मृतदेह आढळला… 

ओव्हरब्रिजजवळ वार्ड नं.०७ मधील तरूणाचा मृतदेह आढळला… 

श्रीरामपूर(प्रतिनिधी)-श्रीरामपूर शहरातील नेवासारोडवर असलेल्या ओव्हरब्रिज खालील रेल्वे रूळाच्या पटरीपासून 15 ते 20 फुटाच्या अंतरावर काल बुधवारी एक मृतदेह आढळून आला. सदरचा मृतदेह हा श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं.7 मधील दळवीवस्ती परिसरात राहणार्‍या अमोल रामदास पवार, वय-32 याचा असून त्याच्या मृतदेहावर खरचटलेल्या काही जखमा आहेत. अमोलचा मृत्यू नेमका कोणत्या कारणाने झाला? हे कारण शवविच्छेदन अहवालानंतरच समजणार असून शहर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.    

       याबाबत काही गुप्त माहिती मिळाल्यास संपर्क साधण्याचे पोलिसांनी आवाहन केले आहे. याप्रकरणी पुढील तपास पोनि.हर्षवर्धन गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोकॉ.वसीम इनामदार हे करीत आहेत.