शिवप्रहार न्युज - श्रीरामपूर MIDC मध्ये चोरट्यांचा धूमाकूळ...

शिवप्रहार न्युज -  श्रीरामपूर MIDC मध्ये चोरट्यांचा धूमाकूळ...

श्रीरामपूर MIDC मध्ये चोरट्यांचा धूमाकूळ...

  श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- श्रीरामपूर एमआयडीसीत मध्यरात्रीतून चोरट्यांनी सात कारखान्यांमधून १ लाख ८७ हजार ५५० रुपयांची चोरी करून धूमाकूळ घातला आहे.

      एमआयडीसीतील केशवकुमार काळे यांच्या केशव प्रोसेसर कंपनीच्या कार्यालयाच्या पाठीमागील बाजूकडील जाळी कापून आत प्रवेश करून चोरांनी टेबलच्या ड्रॉव्हरमध्ये ठेवलेले ९७ हजार ५५० रुपये लांबविले. तर अभिजित कुदळे यांच्या श्री ग्रुप ऑफ इंजस्ट्रीजमधील शटर उचकटून सामानाची उचकापाचक केली. सागर कुकरेजा यांच्या सूर्या प्लास्टिक इंडस्ट्रीजच्या कार्यालयातून १५ हजार रुपये, कन्हैया कुकरेजा यांच्या प्राइड बेकर्सच्या कार्यालयात खिडकीतून आत प्रवेश करून ७५ हजारांची रोकड चोरून नेली. सतीश चोरडिया यांच्या चंचल केबल्सची कड़ी कुलूप तोडून उचकापाचक केली. 

       तसेच किरण काळे यांच्या अमृत ॲग्रोवेट कंपनीचे शेडचे शटर उचकटून साहित्याची उचकापाचक केली, प्रणव जठार यांच्या विद्युत शलाका इलेक्ट्रिक कारखान्यात प्रवेश करताच सुरक्षारक्षकाने पाहिल्याने चोरट्यांनी धूम ठोकली. एकूण १ लाख ८७ हजार ५५० रुपयांची रोकड चोरट्यांच्या हाती लागली. या प्रकरणी केशवकुमार काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.