शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात गंठण चोरासह दरोड्याच्या तयारीतील सात जण पकडले....

शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात गंठण चोरासह दरोड्याच्या तयारीतील सात जण पकडले....

श्रीरामपुरात गंठण चोरासह दरोड्याच्या तयारीतील सात जण पकडले....

   श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- श्रीरामपुरात महिलेचे गंठण पळवणाऱ्या गंठण चोरासह दरोड्याच्या तयारीत असलेले 7 आरोपी स्थानिक गुन्हे शाखेने पकडले आहे.

 याबाबत अधिक माहिती अशी की, राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि.दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना जिह्यातील फरार व पाहिजे आरोपींची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते. नमुद आदेशा प्रमाणे पोनि/दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/सोपान गोरे, पोहेकॉ/मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, देवेंद्र शेलार, पोना/रविंद्र कर्डीले, सचिन अडबल, विजय ठोंबरे, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, पोकॉ/जालिंदर माने, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, किशोर शिरसाठ, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड व चापोहेकॉ. संभाजी कोतकर अशा पोलीस अंमलदारांचे पथक नेमुन कारवाई करणे बाबतचे सुचना दिल्याने. पथक श्रीरामपूर व बेलापुर परिसरात फिरुन फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेत असताना दि.04/08/23 रोजी पोनि/दिनेश आहेर गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, श्रीरामपूर ते वाकडी रोडवरील, दिघी जाणारे रोडवरील रेल्वे बोगद्या जवळ, ता. श्रीरामपूर येथे काही इसम कोठेतरी दरोडा सारखा गंभीर गुन्हा करण्याचे तयारीत असुन अंधारात एकत्र जमलेले आहेत आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाली. प्राप्त माहिती पथकास कळवुन नमुद ठिकाणी जावुन खात्री करुन कारवाई करणे बाबत सुचना दिल्या.

 पथकाने तात्काळ बातमीतील नमुद ठिकाणी जावुन दिघी गावाकडे जाणारे रेल्वे बोगद्याजवळ एमआयडीसी श्रीरामपुर येथे अंधारात मोटारसायकल लावुन काही इसम मोटारसायकलवर व काही इसम त्यांचे जवळ मोटारसायकलचे आडोशाला बसलेले दिसले. पथकाची खात्री होताच अचानक छापा घालुन अंधारात थांबलेल्या इसमांना ताब्यात घेतले. त्यांना पोलीस पथकाची ओळख सांगुन, त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) योगेश सिताराम पाटेकर वय 25, रा. वडाळा महादेव, श्रीरामपुर, 2) अक्षय हिराचंद त्रिभुवन वय 21, रा. वार्ड नं. 07, श्रीरामपुर, 3) बबलु उर्फ दानिश शौकत शेख वय 24, रा. वार्ड नं. 01, श्रीरामपुर, 4) सुरेंद्र अशोक पवार वय 20, रा. निमगांव, शिर्डी, ता. राहाता, 5) साहिल महेश साळुंके वय 18, 6) शुभम वसंत वैद्य वय 22 व 7) सागर संतोष केदारे वय 22 क्र. 5 ते 7 सर्व रा. जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे असल्याचे सांगितले. त्यांना सदर ठिकाणी थांबण्याचे कारण विचारता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे देण्यास सुरुवात केली. पथकाचा संशय बळावल्याने ताब्यातील संशयीतांची पंचा समक्ष अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीत 10 ग्रॅम वजनाचे मिनीगंठण, 5 ग्रॅम वजनाची अर्धवट तुटलेली चैन, 1 एअरगन, 1 तलवार, 3 दांडके, 1 नायलॉन रस्सी, विविध प्रकारचे 6 मोबाईल फोन, 1 टीव्हीएस रायडर व 3 बजाज पल्सर मोटार सायकल असा एकुण 5,61,500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने मिळुन आला. संशयीतांना ताब्यातील मुद्देमाला बाबत विचारपुस करता त्यांनी कोठे तरी दरोड्या सारखा गंभीर स्वरुपाचा गुन्हा करण्याचे उद्देशाने एकत्र जमल्याची कबुली दिल्याने आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपी विरुध्द श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. 824/23 भादविक 399, 402 सह आर्म ऍ़क्ट 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करीत आहे. ताब्यातील आरोपींकडे आनखीन कोठे कोठे व किती गुन्हे केले या बाबत विचारपुस करता आरोपी नामे योगेश सिताराम पाटेकर याने दिनांक 31/07/2023 रोजी संध्याकाळचे वेळी साहिल साळुंके याच्याकडील पल्सर मोटारसायलवर जावुन श्रीरामपुर येथील अशोक टॉकीजचे समोरुन रस्त्याने जाणाऱ्या एका महिलेच्या गळ्यामधुन तोडुन आणलेले असल्याचे सांगुन गुन्हा केल्याची कबुली दिली. त्या अनुषंगाने गुन्हे अभिलेख पडताळणी करता श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन गु.र.नं. 807/23 भादविक 392, 34 प्रमाणे चैन स्नॅचिंगचा गुन्हा दाखल असुन, सदर गुन्हा उघडकिस आला आहे. आरोपी योगेश सिताराम पाटेकर हा सराईत गुन्हेगार असुन त्यांच्याविरुध्द दरोडा, जबरी चोरी, विनयभंग व चोरी असे गंभीर स्वरुपाचे 14 गुन्हे दाखल आहेत.

    सदर कारवाई राकेश ओला, पोलीस अधीक्षक, नगर, श्रीमती. स्वाती भोर, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व डॉ.बसवराज शिवपुजे, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखालील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.