शिवप्रहार न्यूज - "शिवप्रहार प्रतिष्ठान" व जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने शांतिगिरी महाराजांची श्रीरामपूर शहरात भव्य मिरवणूक...

शिवप्रहार न्यूज - "शिवप्रहार प्रतिष्ठान" व जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने शांतिगिरी महाराजांची श्रीरामपूर शहरात भव्य मिरवणूक...

"शिवप्रहार प्रतिष्ठान" व जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने शांतिगिरी महाराजांची श्रीरामपूर शहरात भव्य मिरवणूक...

श्रीरामपूर शहर - वेरूळ येथील मौनगिरी जनार्दन स्वामी आश्रमाचे प्रमुख व मौनगिरी बाबांचे उत्तराधिकारी महामंडलेश्वर ,श्री.श्री.१००८ शांतिगिरीजी महाराज यांचे शिवप्रहार प्रतिष्ठान व जय बाबाजी भक्त परिवाराच्या वतीने शहरात भव्य स्वागत करण्यात आले.यावेळी रथामध्ये बाबाजींची संपूर्ण शहर भरात मिरवणूक काढण्यात आली.तसेच शांतिगिरीजी महाराजांनी या दौऱ्यामध्ये शिवप्रहार प्रतिष्ठानच्या बेलापूररोड,बजरंगनगर येथील कार्यालयास भेट दिली.यावेळी माजी पोलीस अधिकारी सुरजभाई आगे यांनी स्वलिखित “शिवहिंदुत्व”पुस्तक देवुन बाबांचे स्वागत केले.

     याबाबत अधिक माहिती अशी की,शनिवार दिनांक ०७ जानेवारी रोजी सकाळी पावणे १२ च्या सुमारास शांतिगिरीजी महाराजांचे रेल्वे स्टेशन मारुती मंदिर येथे आगमन झाले.यावेळी एमआयडीसीचे अध्यक्ष बाबासाहेब काळे व शिवप्रहार प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष चंद्रशेखर( चंदू )आगे यांनी त्यांचे पुष्पहार घालून स्वागत केले.मारुतीचे दर्शन घेतल्यानंतर ढोल ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतिषबाजीत शांतिगिरीजी महाराजांची रथामध्ये भव्य मिरवणूक सुरू झाली .हनुमान मंदिर ट्रस्टच्या वतीने सुनील गुप्ता व मनोज पोरवाल यांनी बाबाजींचा सत्कार केला.पुढे गांधी पुतळ्याजवळ शहर पोलीस स्टेशनच्या वतीने पोलीस निरीक्षक श्री.हर्षवर्धन गवळी ,चेअरमन सिद्धार्थ मुरकुटे ,विराज आंबेकर ,सेनेचे सुधीर वायखिंडे ,बापूसाहेब शेरकर ,मनसेचे बाबा शिंदे ,पंकज ललवाणी यांनी स्वागत केले.

      त्यानंतर श्रीराम मंदिर चौकामध्ये माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र सोनवणे, राष्ट्र सह्याद्रीचे संपादक करण नवले, जैन समाजाचे अनिल पांडे ,संजय कासलीवाल ,राजेंद्र पाटणी ,मयूर पाटणी ,जितेंद्र कासलीवाल ,महावीर काला ,महावीर पाटणी तसेच भाजपचे मारुती बिंगले ,रुपेश हरकल ,विशाल अंभोरे ,छत्रपती शंभुराजे मित्र मंडळ व सुजित सुखदरे इ.च्या वतीने स्वागत करण्यात आले.श्रीरामपूर वाचनालयाच्या समोर सार्वजनिक गणेशोत्सवाच्या वतीने माजी नगरसेवक अशोक उपाध्ये ,कुणाल करंडे यांनी स्वागत केले.तसेच भगतसिंग चौकामध्ये माजी नगरसेवक रवी पाटील, शिवसेनेचे सचिन बडदे, माळवे काका पत्रकार ,भरत शिंदे यांनी स्वागत केले.पाटाजवळ राजमुद्रा प्रतिष्ठानच्या वतीने निलेश परदेशी तसेच माजी नगरसेवक अमोल धनवटे व इतर सहकाऱ्यांनी स्वागत केले.बेलापूर रोडवरील पेट्रोल पंपाजवळ छावाचे दत्ता करडे ,शेंडे मामा ,रासने मामा यांनी बाबांचा सत्कार केला.

         पुढे बेलापूररोड,बजरंगनगर येथे बेलापूर रोड मित्र मंडळ व लक्ष्मी आई मंदिराच्या वतीने बजरंगनगर भागातील शेकडो महिला व पुरुषांनी शांतिगिरी महाराजांचे पूजन करून स्वागत केले.त्यानंतर धर्मवीर शंभूराजे चौकात अमोल सावंत मित्र मंडळाच्या वतीने स्वागत स्वागत करण्यात आले.छत्रपती शिवाजी महाराज रोडवर नगरपालिकेसमोर माजी नगराध्यक्ष अनुराधाताई अदिक यांच्या वतीने बाबाजींचे भव्य स्वागत झाले.यावेळी त्यांचे सहकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.छत्रपती शिवाजी महाराज चौकातून बाबाजींची मिरवणूक अध्यक्ष श्री.काळे यांच्या खंडाळा येथील पेट्रोल पंपावर कार्यक्रम स्थळी रवाना झाली.