शिवप्रहार न्युज - पॉलीकॅब कंपनीची बनावट वायर पकडली...

शिवप्रहार न्युज - पॉलीकॅब कंपनीची बनावट वायर पकडली...

पॉलीकॅब कंपनीची बनावट वायर पकडली...

   नगर (शिवप्रहार न्यूज)- बाजारात चर्चेत असलेली पॉलीकॅब ही वीज वाहक तार केबल बनावट वायर बंडल नगर शहरात मिळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी रेवनात विष्णू केकान धंदा-नोकरी, रा-हडपसर, पुणे यांच्या फिर्यादीवरून आरोपी प्रल्हादराम सावलाराम देवासी वय-23, धंदा- मॅनेजर, महाराजा एजन्सी, नगर मूळ राहणार राजस्थान तसेच दीपक हिम्मतराव देवासी रा- सुशील अपार्टमेंट जवळ नगर-नेप्ती नाका या दोघांविरुद्ध कोतवाली पोलिसांत कॉपीराईट अधिनियम सन 1957 चे कलम 51 व 63 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी केकान यांनी म्हटले आहे की आरोपी देवासी यांनी पॉलीकॅब पॅकिंग बॉक्स इलेक्ट्रिक केबल चार बॉक्स वायर बंडल बनावट बाळगताना मिळून आले. या जप्त केलेल्या केबल वायर ची किंमत 65,200 इतकी असून ती बनावट वायर असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई पाटील पुढील तपास करीत आहे. या घटनेने बनावट माल विकणाऱ्या व्यापाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.