शिवप्रहार न्युज- श्रीरामपूरात रात्री चायनीज राईस खायला गेलेली मुलगी पळवली...

शिवप्रहार न्युज- श्रीरामपूरात रात्री चायनीज राईस खायला गेलेली मुलगी पळवली...

श्रीरामपूरात रात्री चायनीज राईस खायला गेलेली मुलगी पळवली...

श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज) - राईस खाण्यासाठी चायनीज हॉटेलवर गेलेली शहरातील एका १३ वर्षांच्या मुलीला पळवून नेण्याचा खळबळजनक प्रकार काल रात्री शहरात घडला आहे.
    याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीरामपूर शहरात राहणारी १३ वर्षांची एक अल्पवयीन मुलगी आपल्या मामे बहिणीसह काल दि.२७ मार्च रोजी रात्री ७.३० च्या सुमारास शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक, वॉर्ड नं.७ येथे राईस खाण्यासाठी चायनीज हॉटेलवर गेली होती. हॉटेलमध्ये असताना मी हात धुवून येते, तू येथेच थांब असे आपल्या मामे बहिणीला बोलून ही अल्पवयीन मुलगी हॉटेलबाहेर गेली. परंतु, ती आलीच नाही. याप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या घरच्यांना समजल्यानंतर त्यांनी तिचा आजूबाजूला शोध घेतला पंरतु, ती मिळून न आल्याने तिला अज्ञाताने कशाचेतरी आमीष दाखवून फूस लावून पळवून नेल्याची सदर मुलीच्या आईने फिर्याद दिल्यावरून श्रीरामपूर शहर पोलिसात अज्ञात आरोपीविरूद्ध भादंवि कलम ३६३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पुढील तपास पोनि.गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहेत.