शिवप्रहार न्युज - श्रीरामपूर तालुक्यातील कालची घटना दरोड्याची नाही;नवरा लैंगिक त्रास देतो म्हणुन बायकोने बनाव करुन नवऱ्याचा केला मर्डर…

शिवप्रहार न्युज -  श्रीरामपूर तालुक्यातील कालची घटना दरोड्याची नाही;नवरा लैंगिक त्रास देतो म्हणुन बायकोने बनाव करुन नवऱ्याचा केला मर्डर…

श्रीरामपूर तालुक्यातील कालची घटना दरोड्याची नाही;नवरा लैंगिक त्रास देतो म्हणुन बायकोने बनाव करुन नवऱ्याचा केला मर्डर…

श्रीरामपूर - दिनांक 21/09/2023 रोजी रात्री 01/50 वा. सुमार कोल्हार रोड, एकलहरे शिवार येथे नईम रशिद पठाण याचे घरी दरोडा पडला असुन त्याचे घरुन सात लाख रु. रोख रक्कम व काही दागिने चोरी गेले आहेत, सदर दरोडयामध्ये नईम पठाण यांना साडीच्या साहयाने गळफास लावुन जिवे ठार मारले आहे व त्यांची पत्नी गंभीर जखमी आहे तरी तात्काळ मदत पाठवा. असा पोनि. हर्षवर्धन गवळी यांना कॉल आल्याने पोनि हर्षवर्धन गवळी यांनी घटनेचे गांभीर्य ओळखुन तत्काळ तपास पथक व अधिकारी अंमलदार याचेसह सदर घटनास्थळी जावुन पाहणी केली व जखमीना तात्काळ औषधउपचाराकरीता पाठवुन दिले व सदर घटनेबाबत वरिष्ठांना माहिती दिली. 

       सदर घटनेबाबत श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गुरनं 1014/2023 भादंवि 394,396 प्रमाणे गुन्हा दाखल करुन पुढील तपास चालु केला. तसेच मा.एस.पी. राकेश ओला यांचे आदेशाने पोनि. दिनेश आहेर स्थानिक गुन्हे शाखा,नगर हे पथकासह सदर गुन्हाचा समांतर तपास करणे कामी सदर घटनास्थळी हजर झाले. सदर गुन्हयाचा स्थानिक गुन्हे शाखा व श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन यांचा तपास चालू असताना, सदर घटनास्थळी तांत्रिक विश्लेषण करुन तसेच सदर दरोडयात मयत झालेला नईम रशिद पठाण याची जखमी पत्नी हिचे जाब-जबाब घेतले असता तसेच गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेतली असता सदरचा गुन्हा हा दरोडा नसुन मयत नईम पठाण याची पत्नी बुशरा नईम पठाण, रा. एकलहरे हीने पतीचा मर्डर केला असलेबाबत समजल्याने तिस मयत नईम रशिद पठाण याचा अंत्यविधी कार्यक्रम होताच चौकशी कामी ताब्यात घेतले.

      सदर गुन्हयाबाबत महिला नामे बुशरा नईम पठाण हिचेकडे सखोल तपास केला असता तिने प्रत्येक वेळी वेगवेगळी हकिगत सांगुन पोलीसांची दिशाभुल करण्याचा प्रयत्न केला व उडवाडवीची उत्तरे दिली. सदर महिलेस विश्वासात घेवुन विचारपुस केली असता तिने सांगितले कि,”माझा पती नईम रशिद पठाण हा मला सुमारे ०५ ते ०७ वर्षापासुन नेहमी लैंगिक शोषण करत होता.याच रागातुन मी माझे पती नईम पठाण यास दुधामध्ये झोपेच्या गोळया टाकुन त्यास गुंगी आल्यानंतर साडीचे एक टोक घराचे खिडकीचे गजास बांधुन साडी त्याचे गळयास आवळुन साडीचे दुसरे टोक दोन्ही हाताने ओढुन त्याला जीवे ठार मारले आहे. आमचे घरातील कोणतेही पैसे अगर दागिने चोरी गेले नाही” अशी कबुली दिल्याने तिला सदर गुन्हयात तात्काळ अटक करण्यात आली व सदरचा गुन्हा हा तात्काळ उघडकीस आणला आहे.

     नमुद कारवाई मा. पोलीस अधीक्षक राकेश ओला, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर स्वाती भोर तसेच मा.उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपूर विभाग श्रीरामपूर, डॉ. बसवराज शिवपुजे यांचे मार्गदर्शनाखाली मा.पोनि. दिनेश आहेर साो. स्थानिक गुन्हे शाखा अहमनगर, यांचे पथकातील सुफौ/ बाळासाहेब मुळीक, पोहेकॉ/ मनोज गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, अतुल लोटके,पोना/ज्ञानेश्वर शिंदे, फुरकान शेख, रविद्र कर्डिले, पोकॉ/ सागर ससाणे, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, चालक पोहेकॉ/ गावडे, मपोकॉ/ मिरा सरग, तसेच मा. पोलीस निरीक्षक, श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन, हर्षवर्धन गवळी, यांचेकडील तपास पथकातील सपोनि./ जे. बी. बोरसे, पोसई/ समाधान सोळंके, पोसई / दादाभाई मगरे, मपोसई/ सुरेखा देवरे, पोहेकॉ / शफिक शेख, चालक पोहेकॉ/राजेश सुर्यवंशी, पोना/ रघुवीर कारखेले, रामेश्वर ढोकणे, विरअप्पा करमल, पोकॉ/ राहुल नरवडे, गौतम लगड, संपत बडे, हरिभाऊ पानसबळ, गणेश गावडे, रमिझराजा अत्तार, भारत तमनर, मच्छिद्र कातखडे, संभाजी खरात, नंदु लोखंडे, आकाश वाघमारे, योगिता निकम, होमगार्ड /सर्फराज जहागिरदार, तसेच अॅडीशनल ऑफीसचे पोना/सचिन धनाड, पोकॉ/आकाश भैरट यांनी केली असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी हे करीत आहेत.

      या घटनेच्या अनुषंगाने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यामध्ये आज शुक्रवारी सकाळी पत्रकार परिषद घेण्यात आली.