शिवप्रहार न्युज - जैन समाजाचा 'शिवप्रहार'च्या मुंबईतील आंदोलनास पाठिंबा

शिवप्रहार न्युज - जैन समाजाचा 'शिवप्रहार'च्या मुंबईतील आंदोलनास पाठिंबा

जैन समाजाचा 'शिवप्रहार'च्या मुंबईतील आंदोलनास पाठिंबा...

मुंबई/श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- मुंबई येथील आझाद मैदान येथे सुरू असलेल्या शिवप्रहार प्रतिष्ठानच्या बेमुदत धरणे आंदोलनास दिगंबर जैन समाजाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला आहे.

   श्रीरामपूर जिल्हा व्हावा व इतर मागण्यांसाठी शिव प्रहार प्रतिष्ठानचे प्रमुख माजी पोलिस अधिकारी सुरजभाई आगे यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या धरणे आंदोलनास पाठिंब्याचे निवेदन प्रांताधिकारी यांना देण्यात आले.

   यावेळी अध्यक्ष संजय कासलीवाल, गुलाब झांजरी, अनिल पांडे, भरतभाई बाबरीया, रमेश कोठारी, नितीन मिरीकर, जितु कासलीवाल, ॲड.सुहास चुडीवाल, अनिल चुडीवाल, राजु पाटणी यांच्यासह आदी जैन बांधव उपस्थित होते.

   आज शिवप्रहार प्रतिष्ठानच्या धरणे/ठिय्या आंदोलनाचा १४ वा दिवस आहे.