शिवप्रहार न्युज - उघडे फोटो दाखवण्याची धमकी देवून महिलेवर बलात्कार...
उघडे फोटो दाखवण्याची धमकी देवून महिलेवर बलात्कार...
संगमनेर (शिवप्रहार न्यूज)- तीस वर्षीय महिलेला धमकी देऊन वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार अकोले तालुक्यात घडला आहे. पीडित महिलेच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित महिलेला आरोपी हरिदास लांडे याने 'तुझ्या नवऱ्याला मारून टाकीन व तुझ्या कुटुंबाला संपवून टाकीन' तसेच 'तुझे उघडे फोटो लोकांना दाखवीन' असे म्हणत एप्रिल २०२२ पासून पिडीत महिलेच्या घरात घुसून वेळोवेळी बलात्कार केला. याप्रकरणी काल पीडित महिलेने अकोले पोलिसांत फिर्याद दिल्यावरून आरोपी हरिदास कोंडीबा लांडे याच्याविरुद्ध भादंवि कलम ३७६(२)(एन) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोनि.भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई.हंडोरे हे करीत आहे.