शिवप्रहार न्युज - उंबरे गावातील 'त्या' प्रकरणाची सखोल चौकशी करावी; विश्व हिंदू परिषदेची पालकमंत्री ना.विखेंकडे मागणी...
उंबरे गावातील 'त्या' प्रकरणाची सखोल चौकशी करावी; विश्व हिंदू परिषदेची पालकमंत्री ना.विखेंकडे मागणी...
राहुरी (शिवप्रहार न्यूज)- राहुरी तालुक्यातील उंबरे गावातील शालेय विद्यार्थिनींबरोबर क्लासच्या नावाखाली लव जिहाद, धर्मांतराचे रॅकेट प्रकरणी सखोल चौकशी करून आरोपींवर कठोरात कठोर कारवाई कराण्याची मागणी विश्वहिंदू परिषदेने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली.
यावेळी जिल्हामंत्री श्रीकांत नळकांडे, प्रखंडमंत्री प्रशांत बहिरट, सार्थक परदेशी, उमेश ठाणगे, शुभम गव्हाणे आदि उपस्थित होते.