शिवप्रहार न्युज - मुलींना त्रास दिल्यास गय केली जाणार नाही- नामदार राधाकृष्ण विखे पाटील...

शिवप्रहार न्युज -  मुलींना त्रास दिल्यास गय केली जाणार नाही- नामदार राधाकृष्ण विखे पाटील...

मुलींना त्रास दिल्यास गय केली जाणार नाही- नामदार राधाकृष्ण विखे पाटील...

राहुरी -तालुक्यातील उंबरे गावातील शालेय विद्यार्थीनीच्या संदर्भात घडलेल्या घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांची महसूल तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाजपा नेते आ.प्रसाद लाडयांच्या समवेत भेट घेतली.

       खासगी क्लासमध्ये घडलेल्या घटनेमुळे ग्रामस्थांनी भयभीत होवू नये असा धीर देवून,लव जिहाद करुन मुलींना त्रास दिल्यास त्याची गय केली जाणार नाही असे सांगुन नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी यांना योग्य तपासाच्या सूचना यावेळी दिल्या.

      याप्रसंगी जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले, जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, भाजपाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, विठ्ठलराव लंघे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.