शिवप्रहार न्युज - उंबरे लव जिहाद प्रकरणी राहुरीत सकल हिंदू समाजाचा उद्या भव्य मोर्चा...
उंबरे लव जिहाद प्रकरणी राहुरीत सकल हिंदू समाजाचा उद्या भव्य मोर्चा...
राहुरी (शिवप्रहार न्युज) - राहुरी तालुक्यातील उंबरे येथे दि. २६ जुलै रोजी हिंदू मुलींसोबत घडलेल्या लव जिहाद,धर्मांतर षडयंत्र घटनेच्या निषेधार्थ उद्या शनिवारी ५ ऑगस्ट रोजी राहुरी येथे हिंदू जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या संदर्भात राहुरी येथील सकल हिंदू समाज कृती समितीच्यावतीने पोलीस प्रशासनाला निवेदन देण्यात आले.
राहुरी शहरात व तालुक्यात हिंदू समाजावर होणाऱ्या अन्यायकारक वेगवेगळ्या प्रकारच्या घटनांना जरब बसावी व याचा निषेध व्यक्त करण्यासाठी तसेच उंबरे येथील घटनेच्या निषेधार्थ तसेच हिंदुत्ववादी तरुणांना पोलीस प्रशासनाने अमानुषपणे मारहाण करुन जाणीवपूर्वक खोट्या गुन्ह्यात अडकवल्याच्या निषेधार्थ शनिवार दि. ५ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता सकल हिंदू समाजाच्यावतीने जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. राहुरी येथील वायएमसी मैदान येथून मोर्चा निघणार असून तो मोर्चा धावडे पेट्रोल पंप, शुक्लेश्वर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, शनि चौक या मार्गे निघून मोर्चाची सांगता नवीपेठ येथील जुन्या ग्रामीण रुग्णालयासमोर होणार आहे. येथे हिंदू जन जागृतीविषयक जाहीर सभा घेण्यात येणार आहे. याबाबत पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना निवेदन देण्यात आले आहे.
मोर्चामध्ये सर्व हिंदू समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सकल हिंदू समाज कृती समितीचे सत्यजीत कदम, रविंद्र म्हसे, अमोल भनगडे, राजेंद्र शेटे, संतोष आघाव, नंदकुमार तनपुरे, देवेंद्रलांबे, बाबासाहेब शिंदे, प्रविण बोरुडे, गंगाभाऊ उंडे, प्रदिप भुजाडी, विजय तमनर, गणेश खैरे यांनी केले आहे.
उद्या होणाऱ्या हिंदू जनआक्रोश मोर्चाच्या अनुषंगाने जिल्हा पोलिस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी राहुरी येथे आज भेट देऊन मोर्चा मार्गाची पाहणी करून अधिका-यांना आवश्यक सूचना करण्यात आल्या आहेत.