शिवप्रहार न्युज - पाटबंधारे कर्मचाऱ्याला लाच घेताना पकडले...

शिवप्रहार न्युज  - पाटबंधारे कर्मचाऱ्याला लाच घेताना पकडले...

पाटबंधारे कर्मचाऱ्याला लाच घेताना पकडले...

   नगर (शिवप्रहार न्यूज)- जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील कुकडी पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता विभागात दप्तर कारकून पदावर काम करणारा आरोपी सुभाष यादव वाबळे वय-५६, धंदा-नोकरी, राहणार-श्रीगोंदा स्टेशन रोड याला १५०० रुपयांची रोख रक्कम लाच घेताना नगरच्या लाचलुतपत पथकाने रंगेहात पकडले आहे. डीवायएसपी प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा पथक कर्मचारी रमेश चौधरी, विजय गंगुल, पोना.राधा खेमनर, पोलीस अंमलदार रवींद्र निमसे, बाबासाहेब कराड, वैभव पांढरे चालक पोहेकॉ.दशरथ लाड यांनी ही कामगिरी केली.

    तक्रारदार व्यक्तीला आरोपी वाबळे याने एक एकर क्षेत्रासाठी धनगरवाडी जलाशयातून पाणी उपसा करण्याची परवानगी मिळण्याबाबत अर्ज करून परवानगी मागितली होती, त्या बदल्यात आरोपी वाबळे यांनी तक्रारदार शेतकऱ्याकडे २ हजाराची लाच मागितली तडजोडी अंती १५०० रुपयांची लाच घेताना सापळा लावलेल्या जाळ्यात आरोपी वाबळे रंगेहात रक्कम घेताना पकडला गेला. लाचलुचपतच्या नाशिक विभागाच्या एसपी.शर्मिला घारगे/वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

   सध्या पाटबंधारे विभागात पाण्याच्या वाटपात अनेक गैरप्रकार होतात अशी चर्चा असतानाच हा प्रकार घडल्याने लाचखोर कर्मचारी पकडला गेला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्मचाऱ्याला लाच घेताना पकडल्याने पाटबंधारे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.