शिवप्रहार न्युज - प्रभू श्रीरामांचा इंस्टाग्रामवर अपमान; बेलापूरच्या आदिल शेखला अटक...

प्रभू श्रीरामांचा इंस्टाग्रामवर अपमान; बेलापूरच्या आदिल शेखला अटक...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- अखंड हिंदुस्थानचे व हिंदू धर्माचे श्रध्दास्थान असलेले प्रभु श्रीराम यांच्याबद्दल बेलापूर येथील आदिल रसूल शेख याने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करून हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या आहे.
याबाबत घटनेची अधिक माहिती अशी की, पढेगाव येथील तरुण कृष्णा राजेंद्र ढेपे हा रात्री आपल्या मोबाईल मध्ये इंस्टाग्राम अकाउंट पाहत असताना बेलापूर येथील आदिल रसूल शेख याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून अखंड हिंदू धर्माचे श्रद्धास्थान असलेले प्रभू श्रीराम यांच्या बद्दल आक्षेपार्ह व्हिडिओ पोस्ट करून,हिंदू धर्मियांच्या श्रद्धांचा अपमान करून,धार्मिक भावना भडकवणारे कृत्य करून,दोन समाजामध्ये शत्रुत्वाची देशाची भावना निर्माण केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी कृष्णा राजेंद्र ढेपे या तरुणाने श्रीरामपूर तालुका पोलीसात फिर्याद दिल्यावरून बेलापूर येथील आरोपी आदिल रसूल शेख याच्याविरुद्ध श्रीरामपूर तालुका पोलिसांत भादवि कलम २९५-अ ,५०५(२) प्रमाणे गुरनं-४०८/२०२३ दाखल करण्यात आला असुन आरोपीला अटक करण्यात आली आहे.याप्रकरणी पुढील तपास श्रीरामपूर तालुका पोलीस करत आहे.
श्रीरामपुरातील हिंदू धर्मीय बांधव या संतापजनक कृत्याचा निषेध करत आहे.