शिवप्रहार न्युज - श्रीरामपूरचे ॲड.सौरभ गदिया ठरले 'मिस्टर महाराष्ट्र आयकॉन २०२३' चे मानकरी...
श्रीरामपूरचे ॲड.सौरभ गदिया ठरले 'मिस्टर महाराष्ट्र आयकॉन २०२३' चे मानकरी...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- "कलिनन" पुणे आयोजित राज्यस्तरीय स्पर्धेत श्रीरामपूर येथील ॲड.सौरभ गदिया यांना 'मि.महाराष्ट्र आयकॉन २०२३' नुकताच प्रदान करण्यात आला. पुणे येथील आंतरराष्ट्रीय मॉडेलिंग तसेच चित्रपट आणि कलाविषयक संस्था कलिनन पुणे यांनी नुकतीच पुणे येथे महाराष्ट्र आयकॉन २०२३ अशी स्पर्धा आयोजित केली होती.
सदर स्पर्धेमध्ये मि.महाराष्ट्र आयकॉन, मास्टर महाराष्ट्र आयकॉन आणि मिस महाराष्ट्र आयकॉन अशा तीन विविध श्रेणीतील स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या होत्या. सदर स्पर्धेचे आयोजन पुणे येथे एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये करण्यात आले होते. श्रीरामपूर येथील प्रसिध्द ॲड.सौरभ गदिया यांची पुर्वीच या स्पर्धेतील अंतिम स्पर्धक म्हणून निवड झाली होती. या स्पर्धेची अंतिम फेरी नुकतीच ताथवडे, पुणे येथील हॉटेल मध्ये आयोजित करण्यात आली होती. सदर स्पर्धेवेळी सुरुवातीस बालकांसाठी असणारा मास्टर महाराष्ट्र आयकॉन तसेच मिसेस महाराष्ट्र आयकॉन या स्पर्धा पार पडल्या. बालकांसाठीच्या मास्टर आयकॉन २०२३ या स्पर्धेत श्रीरामपूर येथील भुमिपुत्र अर्जुन हर्षद चव्हाण याला वेस्ट ॲटीट्युडचे पारितोषिक मिळाले. अर्जुन हा हर्षद व भाजपाच्या महिला नेत्या सौ. पुजा चव्हाण (कांबळे) यांचा मुलगा आहे.
यानंतर मिस्टर महाराष्ट्र आयकॉन २०२३ ही बहुप्रतिक्षित अटीतटीची स्पर्धा पार पडली. या स्पर्धेत मिस्टर महाराष्ट्र आयकॉन हा किताब मिळविण्यासाठी संपुर्ण भारतातुन विविध क्षेत्रातील विविध प्रतिभाशाली, प्रभावशाली आणि देखण्या व्यक्तीमत्वांच्या स्पर्धकांनी आपली हजेरी नोंदविलेली होती. या स्पर्धेत भाग घेणा-या स्पर्धकाचे एकंदरीत वर्तन सदर स्पर्धकाची देहबोली, बुध्दीमत्ता, दिसणे आणि एकंदरीत व्यक्तीमत्वाची परिपक्वता या निकषांवर अंतिम विजेत्या स्पर्धकाची निवड केली जाणार होती. एकंदरीत शेवटच्या फेरीत सुमारे नऊ स्पर्धकांनी आपआपल्या कलागुणांचे व्यक्तीमत्वाचे आणि बुध्दीमत्तेचे सादरीकरण केले आणि विशेष म्हणजे या सर्व उर्वरित आठ स्पर्धकांवर मात करीत श्रीरामपूर येथील प्रसिध्द ॲड.सौरभ गदिया यांनी हा अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा 'मि.महाराष्ट्र आयकॉन २०२३' हा पुरस्कार प्राप्त केला.
या स्पर्धेच्या संयोजिका ममता राजपूत तसेच कलिनन पुणे या संस्थेचे संचालक सुमेश राजपूत यांनी तसेच उपस्थित परीक्षकांनी एकमताने ॲड.सौरभ गदिया यांची या पुरस्कारासाठी निवड केली. सदर स्पर्धेच्या वेळी ॲड. सौरभ यांची निवड होत असतांना प्रेक्षकांकडून मते मागविण्यात आली तेव्हा प्रेक्षकांमधून सातत्याने केजीएफ रॉकीभाई, रॉकी आणि सौरभ अशा प्रकारच्या नावांचा उल्लेख वारंवार केला जात होता. श्रीरामपूर सारख्या आपल्या शहरातील एका तरूण वकीलाने हा राज्यस्तरीय मानाचा पुरस्कार आपल्या व्यक्तिमत्व आणि बुध्दीमत्तेच्या जोरावरती मिळविल्यामुळे त्याचे संपुर्ण जिल्हयामधील वकील मंडळी तसेच या क्षेत्रातील तज्ञांकडून अभिनंदन केले जात आहे. ॲड. सौरभ गदिया यांची आगामी काळात होणा-या कलकत्ता येथील मिस्टर इंडिया या स्पर्धेसाठी देखिल नाव नोंदणी होऊन त्यासाठी मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे.