शिवप्रहार न्युज - नेवाशातील उपोषणाची प्रशासनाने घेतली दखल;११ आरोपींविरोधात झाला गुन्हा दाखल...

शिवप्रहार न्युज - नेवाशातील उपोषणाची प्रशासनाने घेतली दखल;११ आरोपींविरोधात झाला गुन्हा दाखल...

नेवाशातील उपोषणाची प्रशासनाने घेतली दखल;

११ आरोपींविरोधात झाला गुन्हा दाखल...

नेवासा-श्रीक्षेत्र नेवासा हि एक पुरातन भूमी व हिंदूंचे महत्त्वाचे धार्मिक केंद्र आहे.याच नेवासा शहरातून जाणाऱ्या प्रवरामाई नदीच्या पात्रामध्ये मांस व रक्त मिश्रित पाणी हिंदुत्ववादी तरुणांना आढळून आले होते. प्रवरामाईचे पावित्र्य भंग करणाऱ्या या प्रकाराविरोधात हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने व हिंदू समाजाच्या वतीने शहरात काल शनिवार दि.१९/०८/२०२३ रोजी उपोषण करण्यात आले.

     या उपोषणाची प्रशासनाने तात्काळ दखल घेत नेवासा नगरपंचायतच्या वतीने मुकादम ताराचंद चव्हाण यांनी कत्तलखाना चालवणाऱ्या व त्याचे रक्तमिश्रित पाणी नदीत सोडणाऱ्या ११ आरोपींविरोधात तक्रार नोंदवली. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास नेवासा पोलिसांकडून चालू आहे.प्रशासनाने तात्काळ उपोषणाची दखल घेतल्यामुळे व आरोपींवर गुन्हा दाखल केल्याने हिंदू बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे.