शिवप्रहार न्युज - ७३ वर्षांची परंपरा असलेल्या श्रीरामपूर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची आरती ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न...
७३ वर्षांची परंपरा असलेल्या श्रीरामपूर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची आरती ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते संपन्न...
श्रीरामपूर- श्रीरामपूर शहरातील मेन रोडवर असणाऱ्या सार्वजनिक वाचनालय-आझाद मैदान येथे गेल्या 73 वर्षापासून श्रीरामपूर सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येतो.यावर्षी देखील या मंडळाच्या वतीने धुमधडाक्यात गणेशोत्सवाचे कार्यक्रम सुरु आहेत.नुकतेच मंडळाचे अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांनी राज्याचे महसूल, दुग्धविकास मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभहस्ते गणपती बाप्पाच्या आरतीचे आयोजन केले.
हा कार्यक्रम उत्साहात पार पडला. यावेळी भाजपाचे नितीन दिनकर यांच्यासह मंडळाचे अध्यक्ष,उपाध्यक्ष व पदाधिकारींसह गणेशभक्त उपस्थित होते.