शिवप्रहार न्युज - कार चोरी करणारा सराईत आरोपी 4,50,000/- रुपये किंमतीचे स्विफ्टकारसह जेरबंद…
कार चोरी करणारा सराईत आरोपी 4,50,000/- रुपये किंमतीचे स्विफ्टकारसह जेरबंद…
नगर - प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, फिर्यादी श्री. रमेश दामोधर शेवाळे वय 62, रा. गणेश कॉलनी, नवनागापुर, ता. नगर यांनी राहते घरा समोर लावलेली स्विफ्टकार दिनांक 09/10/23 रोजी कोणीतरी अनोळखी चोरट्यांनी चोरुन नेली होती. सदर घटने बाबत एमआयडीसी पोलीस स्टेशन गु.र.नं. 936/2023 भादविक 379 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरची घटना घडल्यानंतर मा. श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना नमुद गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/हेमंत थोरात, पोहेकॉ/बापुसाहेब फोलाणे, संदीप पवार, देवेंद्र शेलार, पोना/रविंद्र कर्डीले, संदीप चव्हाण, पोकॉ/आकाश काळे, बाळासाहेब गुंजाळ व चापोहेकॉ/संभाजी कोतकर अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन सदर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेवुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आवश्यक मार्गदर्शन करुन पथकास रवाना केले. पथक रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेत असताना पोनि/श्री. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, वर नमुद गुन्ह्यातील स्विफ्ट कार ही नदीम शेख रा. बजाज नगर, जालना याने चोरी केली असुन, चोरी केलेली कार विक्री करण्यासाठी धनगरवाडी टोलनाका, नगर ते छत्रपती संभाजीनगर रोड येथे येणार आहे आता गेल्या मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन खात्री करुन कारवाई करणेबाबत सुचना दिल्याने पथकाने दिनांक 19/10/23 रोजी 12.10 वा. चे सुमारास धनगरवाडी टोलनाका येथे जावुन सापळा लावुन थांबलेले असताना थोडाच वेळात एक स्विफ्टकार टोलनाक्या जवळ येवुन थांबलेली पथकास दिसली. पथकाची खात्री होताच कारमधील चालकास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) शेख नदीम दाऊद शेख वय 33, हल्ली रा. बजाज नगर, जिल्हा जालना (मुळ रा. दाढ, जिल्हा बुलढाणा) असे सांगितले. त्यास त्यांचे ताब्यातील स्विफ्ट कारचे कागदपत्रे व मालकी हक्का बाबत विचारपुस करता सुरुवातीस तो उडवा उडवीची उत्तरे देवु लागला त्यास अधिक विश्वासात घेवून सखोल व बारकाईने विचारपुस करता त्याने एमआयडीसी परिसरातुन कार चोरी केली असुन विक्री करण्यासाठी आलो आहे अशी कबुली दिल्याने आरोपीस 4,50,000/- रुपये किंमतीचे स्विफ्टकारसह ताब्यात घेवुन मुद्देमालासह एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास एमआयडीसी पोलीस स्टेशन करीत आहे.
आरोपी नामे शेख नदीम दाऊद शेख हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर, नाशिक, संभाजीनगर, जालना, बुलढाणा जिल्ह्यात चोरी व इतर कलमान्वये एकुण 12 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे -
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. धाड, जिल्हा जालना 24/2015 भादविक 279, 337, 338, 427
2. फुंलब्री, जिल्हा संभाजीनगर 159/2018 भादविक 379, 34
3. बेगमपुर, जिल्हा संभाजीनगर 37/2018 भादविक 379
4. चंदनझिरा, जिल्हा जालना 29/2020 भादविक 379, 34
5. कन्नड शहर, जिल्हा संभाजीनगर 437/2020 भादविक 379
6. सिल्लौड शहर, जिल्हा संभाजीनगर 40/2021 भादविक 379
7. संगमनेर शहर 702/2021 भादविक 379, 201, 34
8. सिन्नर, जिल्हा नाशिक 1208/2021 भादविक 379, 411, 34
9. कंटान्मेंट, जिल्हा संभाजीनगर 311/2021 भादविक 188, 269, 270
10. देऊळगांव राजा, जिल्हा बुलढाणा 357/2022 भादविक 379
11. तोफखाना 828/2023 भादविक 379 (फरार)
12. लासगांव, जिल्हा नाशिक 118/2023 भादविक 379 (फरार)
सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, मा. श्री. प्रशांत खैरे, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर व मा. श्री. संपत भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामिण विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.