शिवप्रहार न्युज- कत्तलीसाठी जाणाऱ्या ३,६८,०००/रू किमतीच्या १६ गोवंशांची केली सुटका…
कत्तलीसाठी जाणाऱ्या ३,६८,०००/रू किमतीच्या १६ गोवंशांची केली सुटका…
नगर:- गोवंशी जातीच्या गायी व गावरान वासरु इसम नामे अरबाज इलियास अहमद कुरेशी ,वय २६ वर्षे, रा. घर नं. २१२१, तपकिर गल्ली, दाळ मंडई अ.नगर हा कोठला स्टॅन्ड, फलटण चौकी अ.नगर येथे कत्तल करण्याच्या इरादयाने गोवंश जातीचे जनावरे उपाशीपोटी ठेवलेली बिना अन्न पाणचे चारचाकी वाहना मध्ये ठेवलेले मिळून आल्याने शहर वाहतूक शाखेचे सहाय्यक फौजदार / मन्सुर पाशामिय्याँ सय्यद वय ५५ वर्ष, नेम शहर वाहतुक शाखा यांनी तोफखाना पोलीस स्टेशनला आरोपी नामे- अरबाज इलियास अहमद कुरेशी याच्याविरुध्द प्राण्याचा छळ प्रतिबंध कायदा कलम ५ (अ), ५ (१)(ब) प्राण्यांना कुरतेने वागवणुक देण्यास प्रतिबंध कलम ४७,४८,५०,५३ सह मोटार वाहन
कायदा कलम १५८,१७७ प्रमाणे फिर्याद दिली आहे.
याबात सविस्तर हकीकत अशी की,शहर वाहतुक शाखेचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंन्दाम यांना गुप्त बातमीदारा मार्फेत बातमी मिळाली की, कोठला स्टॅन्ड भागामध्ये येथे एक चार चाकी वाहना मध्ये काही गोवंशी जनावरे कत्तलीसाठी घेवुन जात आहे अशी माहिती मिळाली आहे. ताबडतोप सदर वाहनाचा शोध घेवुन पुढील कार्यवाही करा, असे कळविल्याने ताबडतोप सदर माहिती दिल्या प्रमाणे वाहनांचा शोध घेत असतांना एक पांढ-या रंगाचा चार चाकी वाहन अशोक लेलेन कंपनीची दोस्त मॉडेल असलेले पिकअप टॅम्पो तीचा क्रमांक एम. एच १६ सी.डी. १७०५ ही मिळुन आली तेव्हा वाहतूक पोलिसांनी त्या वाहनास हात करुन थांबण्यास सांगितले.तेव्हा त्याने सदर वाहन कोठला स्टॅन्ड, फलटण चौकी अ.नगर येथे थांबवली व शहर वाहतूक पोलिसांनी त्या गाडी चालकास सदर गाडी मध्ये काय आहे याची विचारणा केली असता सदर चालकाने उडवा उडवीचे उत्तर दिले.त्यावेळी पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंन्दाम यांना सदर चालकावर संशय आल्याने सदर वाहन चेक केली असता सदर चारचाकी वाहना मध्ये गोवंश जातीचे जनावरे उपाशीपोटी ठेवलेली बिना अन्न पाणचे मिळून आले. वाहतूक पोलिसांनी सदर वाहन चालकास त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव अरबाज इलियास अहमद कुरेशी वय २६ वर्षे, रा. घर नं. २१२१, तपकिर गल्ली, दाळ मंडई अ.नगर असे सांगितले. त्यानंतर सदर चालकास त्याचे ताब्यातील वाहनासह त्यामधील गोवंशी जनावरे घेवुन शहर वाहतुक शाखा येथे घेवुन व त्यानंतर वाहतूक पोलिसांनी तोफखाना पोलीस स्टेशनला फोन व्दारे सदर घटनेची माहीती ठाणे अंमलदार सफौ बादशाह शेख यांनी कळविले.
त्यावेळी काळी वेळातच तोफखाना पोस्टेचे कर्मचारी पोकॉ/ शफी शेख व पोकॉ/ ताके असे दोन कर्मचारी आले. त्यानंतर तोफखाना पोस्टेचे कर्मचारी पोकों/ शफी शेख व ताके सदर चालकास वाहनासह गोवंशी जनावरे घेवुन तोफखाना पोस्टे जमा करण्यात आली. सदर चारचाकी वाहना मध्ये खालील वर्णनाच्या गोवंश जातीच्या जनावरे मिळून आल्या त्या.1) ४०,०००/- रू किच्या २ जर्शी जातीच्या गायी त्या काळया पांढ-या रंगाच्या किं अं ) २८,०००/- रू किंचे १४ गाय जातीचे काळया पांढ-या रंगाचे गावरान वासरू किंअं ३,००,०००/- रु किंची अशोक लेलेन कंपनीची दोस्त मॉडेल असलेले पिकअप टॅम्पो
३)तिचा क्रमांक एम. एच १६ सी.डी. १७०५ असा
३,६८,०००/- रू एकुण रुपये किमतीचा मुद्देमाल शहर वाहतूक पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, शहर उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंन्दाम यांच्या सह पोलीस अमलदार अधिकारी यांनी केली आहे.