शिवप्रहार न्युज - श्रीरामपुरात भरशहरात डॉक्टरला बांधून जवळपास 40 लाखाचा ऐवज चोरला ...

शिवप्रहार न्युज -  श्रीरामपुरात भरशहरात डॉक्टरला बांधून जवळपास 40 लाखाचा ऐवज चोरला ...

श्रीरामपुरात भरशहरात डॉक्टरला बांधून जवळपास 40 लाखाचा ऐवज चोरला ...

श्रीरामपूर(शिवप्रहार न्युज) - श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर 07 मधील काळाराम मंदिराजवळील डॉक्टर ब्रम्हे यांच्या मंगेश हॉस्पिटल वजा घरावर आज सोमवार 30 ऑक्टोबर 2023 रोजी पहाटे तीन चोरट्यांनी शिडीच्या साह्याने गच्चीवरून घरात प्रवेश करून डॉक्टर ब्रह्मे यांना बांधून जवळपास 40 लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली आहे.

         याबाबत अधिक माहिती अशी की, डॉक्टर प्रफुल्ल ब्रम्हे यांचे काळाराम मंदिर जवळ हॉस्पिटल वजा घर आहे. त्यांच्या पत्नी देवदर्शनासाठी बाहेरगावी गेल्या होत्या. पहाटे ४:३० च्या सुमारास तीन चोरट्यांनी शेजारी राहणारे भेळवाले सोमनाथ चव्हाण यांच्या शिडीचा वापर करून गच्चीवरून घरात प्रवेश केला व डॉक्टर ब्रम्हे यांना बांधून चादरीने तोंड पॅक करून त्यांच्या मुलाला खोलीत कोंडून रोकड, मोबाईल व सोने वगैरे ऐवज चोरुन नेल्याची खात्रीशीर माहिती मिळत आहे.

    घटनास्थळी डिवायएसपी बसवराज शिवपुजे व शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गवळी यांनी भेट दिली.यावेळी डीवायएसपी शिवपूजे म्हणाले की.”नागरिकांनी एवढ्या मोठ्या संख्येने रोकड व मौल्यवान वस्तू घरात ठेवू नये”.

    श्रीरामपूर शहरात चोरट्यांचा जोरदार धुमाकूळ चालू असून गंठण चोरीसह, जबरीचोरी, दरोड्यांचे प्रमाण वाढले आहे. शहरातीलच एका प्रसिद्ध डॉक्टरांच्या येथुन चोरट्यांनी लाखोंची रोकड चोरून नेली होती तिचा अजून तपास लागलेला नाही.