शिवप्रहार न्युज - 3,27,500/- रुपये किंमतीचा गावठी कट्टा, 3 जिवंत काडतुस,सोन्याचे दागिने व चोरीच्या बाईकसह आरोपी जेरबंद…

शिवप्रहार न्युज -  3,27,500/- रुपये किंमतीचा गावठी कट्टा, 3 जिवंत काडतुस,सोन्याचे दागिने व चोरीच्या बाईकसह आरोपी जेरबंद…

3,27,500/- रुपये किंमतीचा गावठी कट्टा, 3 जिवंत काडतुस,सोन्याचे दागिने व चोरीच्या बाईकसह आरोपी जेरबंद…

नगर-याबाबत अधिक माहिती अशी की,श्री.राकेश ओला,पोलीस अधिक्षक, नगर यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, नगर यांना जिल्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींची माहिती घेवुन, आरोपी मिळुन आल्यास आवश्यक कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.

       नमुद आदेशान्वये दिनांक 30/10/2023 रोजी पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सपोनि/हेमंत थोरात, पोहेकॉ/सुनिल चव्हाण, दत्तात्रय हिंगडे, संदीप पवार, देवेंद्र शेलार, पोना/रविंद्र कर्डीले, भिमराज खर्से, संतोष खैरे, पोकॉ/सागर ससाणे, मेघराज कोल्हे, मपोकॉ/सोनाली साठे व चापोहेकॉ/उमाकांत गावडे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पथक नेमुन अहमदनगर जिल्ह्यातील फरार व पाहिजे आरोपींचा शोध घेणेबाबत आवश्यक सुचना देवुन पथकास लागलीच रवाना केले. पथक सुपा व पारनेर परिसरात फिरुन फरार व पाहिजे आरोपींची माहिती घेत असताना पोनि/श्री. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, इसम नामे तुकाराम ऊर्फ राजु वारे हा त्याचे साथीदारांसह गावठी कट्टा, जिवंत काडतुस व सोन्याचे दागिने विक्री करणे करीता नगर कल्याण रोड, पारनेर फाटा, टाकळी ढोकेश्वर, ता. पारनेर येथे येणार आहे, आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन, पंचाना सोबत घेवुन, खात्री करुन कारवाई करणे बाबत कळविले. पथकाने बातमीतील नमुद ठिकाणी जावुन पहाणी करता एक इसम मोटार सायकलवर बसलेला व त्यांचे आजु बाजूस तीन इसम बोलताना दिसले. पथकाची खात्री होताच संशयीतांना शिताफीने ताब्यात घेतले. 

      ताब्यात घेतलेल्या इसमांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) तुकाराम ऊर्फ राजेंद्र बन्सी वारे ऊर्फ मधे वय 21, रा. माळवाडी पळशी ता. पारनेर, 2) रोशन संपत रोकडे वय 23, रा. वडगांव सावताळ ता. पारनेर, 3) प्रविण लक्ष्मण दुधावडे वय 21, रा. अकलापुर घारगांव ता. संगमनेर, 4) दिपक मधुकर शिंदे वय 20, रा. वडगांव सावताळ, ता. पारनेर असे असल्याचे सांगितले. त्यांची पंचासमक्ष अंगझडती घेता त्यांचे अंगझडतीत एक गावठी कट्टा, तीन जिवंत काडतुसे, सोन्याचे दागिने व विना नंबर शाईन मोटार सायकल मिळुन आली. पथकाने आरोपींचे कब्जात मिळुन आलेल्या मुद्देमाला बाबत विचारपुस करता आरोपींनी गावठी कट्टा, जिवंत काडतुस व दागिने विक्री करण्याचे उद्देशाने आणले बाबत माहिती दिली.

ताब्यातील आरोपींचे कब्जात मिळुन आलेले सोन्याचे दागिने व मोटार सायकलबाबत सखोल व बारकाईने विचारपुस करता आरोपींनी वासुंदे शिवारातील, वडगांव सावताळ, ता. पारनेर व ढोकी, ता. पारनेर येथील महिलांचे गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. तसेच विनानंबर शाईन मोटार सायकल ही मलठण फाटा, शिक्रापुर, ता. शिरुर, जिल्हा पुणे येथुन चोरी केल्याची कबुली दिल्याने नगर व पुणे जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी करता खालील प्रमाणे गुन्हे उघडकिस आले आहेत.

अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम

1. पारनेर 1000/23 भादविक 392

2. पारनेर 1020/23 भादविक 394, 34

3. शिक्रापुर, जिल्हा पुणे 919/23 भादविक 379

4. राहुरी 530/19 भादविक 224, 353, 332, 337 .

 ताब्यातील आरोपी नामे तुकाराम ऊर्फ राजेंद्र बन्सी वारे ऊर्फ मधे हा सराईत गुन्हेगार असुन तो मंचर पोलीस स्टेशन, जिल्हा पुणे येथे दाखल गु.र.नं. 247/2019 भादविक 454, 457, 380 या गुन्ह्याचे तपासावेळी राहुरी परिसरातुन मंचर पोलीसांचे हाताला झटका देवुन बेडीसह पळुन जावुन पोलीस पथकावर दगडफेक केली असुन त्या बाबत राहुरी पोलीस स्टेशन गु.र.नं. 530/2019 भादविक 224, 353, 332, 337 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

 ताब्यातील आरोपींचे कब्जातुन 30,000/- रुपये किंमतीचा एक गावठी कट्टा, 1,500/- रुपये किंमतीची तीन जिवंत काडतुसे, 2,16,000/- रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने व 80,000/- शाईन मोटार सायकल असा एकुण 3,27,500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. आरोपींना मुद्देमालासह पारनेर पोलीस स्टेशन येथे हजर केले असुन, पुढील तपास पारनेर पोलीस स्टेशन करित आहे.

आरोपी नामे राजेंद्र ऊर्फ तुकाराम बन्सी वारे ऊर्फ मधे हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर व पुणे जिल्ह्यात दरोडा, घरफोडी, चोरी व इतर कलमान्वये एकुण -10 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे -

अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम

1. अकोले 183/2019 भादविक 379, 34

2. राहुरी 530/2019 भादविक 224, 353, 332 (फरार)

3. मंचर, जिल्हा पुणे 247/2019 भादविक 454, 457, 380

4. पारनेर 354/2022 भादविक 143, 147, 188

5. पारनेर 897/2023 भादविक 395 विद्युत अधिनियम क. 136 (फरार)

6. शिक्रापुर, जिल्हा पुणे 919/2023 भादविक 379

       सदरची कारवाई मा. श्री. राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर व श्री. संपत भोसले, उपविभागीय पोलीस अधिकारी, नगर ग्रामिण विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.