शिवप्रहार न्युज - गुहा गावात जिहादीप्रवृत्तींकडुन पुजारी-भाविकांना मारहाण;गावात तणावपूर्ण शांतता ...
गुहा गावात जिहादीप्रवृत्तींकडुन पुजारी-भाविकांना मारहाण;गावात तणावपूर्ण शांतता ...
राहुरी- तालुक्यातील गुहा येथील कानिफनाथ देवस्थानाचा वाद आज सोमवारी पुन्हा उफाळून आला असून अमावस्यानिमित्त सुरू असलेल्या पुजा व धार्मिक कार्यक्रमात जिहादीप्रवृत्तींच्या जमावाने शिरून पुजारी व भाविकांना मारहाण केल्याने गुहा गावात तणाव निर्माण झाला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी, गेल्या अनेक वर्षापासून गुहा येथील कानिफनाथ देवस्थानावरून दोन समाजात वाद सुरू आहे. याबाबत न्यायालयात खटला दाखल आहे. प्रशासनाने दोन्ही समाजाच्या ज्येष्ठ लोकांच्या अनेक वेळा बैठका घेऊन तोडगा काढण्यासाठी प्रयत्न ही केले. यावर दोन्ही समाजाला मान्य होतील असा तात्पुरता तोडगा देखील काढण्यात आला.
परंतू, आज दि. १३ नोव्हेंबर रोजी सकाळी अमावस्यानिमित्त पुजा करण्यासाठी गेलेल्या पुजाऱ्याला व भाविकांना जिहादीप्रवृत्तींकडुन महिलांना बरोबर घेऊन धार्मिक ठिकाणी जाऊन जबर मारहाण करण्यात आली.या घटनेमुळे गावात चांगलाच तणाव निर्माण झाला असून या घटनेची माहिती पोलीस प्रशासनाला समजताच मोठा फौजफाटा गुहा गावात तैनात करण्यात आला असून परिस्थिती नियंत्रणात परंतू तणावपूर्ण असल्याचे समजते.