शिवप्रहार न्युज - अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा प्रसंगी घराघरात दिवाळी व गुढीपाडव्यासारखा उत्सव साजरा करा-भास्करगिरीजी महाराज
अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा प्रसंगी घराघरात दिवाळी व गुढीपाडव्यासारखा उत्सव साजरा करा-भास्करगिरीजी महाराज
नेवासा(प्रतिनिधी) नेवासा तालुक्यातील श्री क्षेत्र देवगड गुरुदेव दत्त पीठ येथे श्रीराम अक्षता मंगल कलश यात्रा अयोध्या आयोजित संत संमेलनास संत महंतांसह श्रीराम भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.दि.२२ जानेवारी रोजी रामलल्ला हे सिंहासनावर आरूढ झाल्यानंतर तीर्थक्षेत्र अयोध्या ही जागतिक आध्यात्मिक नगरी जगामध्ये बनेल असा विश्वास गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
दि.२२ जानेवारी रोजी अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होत असताना घराघरात दिवाळी व गुढी पाडवा पद्धतीने हा उत्सव साजरा करा असे आवाहन गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज यांनी यावेळी बोलताना केले.
श्रीराम जन्मभूमी ट्रस्ट तीर्थक्षेत्र अयोध्या व विश्व हिंदू परिषद नगर जिल्हा यांच्या वतीने संत संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.श्री क्षेत्र देवगड गुरुदेव दत्त पिठाचे प्रमुख महंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज संत संमेलनच्या अध्यक्षस्थानी होते.
त्रिंबकेश्वर येथील प.पू.माधवदास राठी महाराज,देवगड संस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज, सदगुरू नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुखख हभप उद्धवजी महाराज मंडलिक,आळंदी येथील हभप नरहरी महाराज,साध्वी ललिता माई महाराज,श्रीराम साधना आश्रमाचे महंत सुनीलगिरीजी महाराज, त्रिवेणीश्वर देवस्थानचे महंत रमेशानंदगिरीजी महाराज,विश्व हिंदू परिषदेचे देवगिरी प्रांत कार्याध्यक्ष डॉ.हभप जनार्धन महाराज मेटे,महंत योगी दीपकनाथजी महाराज,इमामपूर येथील जंगली महाराज आश्रमाचे महंत श्री बाळकृष्ण महाराज,हभप बाळकृष्ण महाराज सुडके,भगवान महाराज जंगले शास्त्री,हभप नंदकिशोर महाराज खरात,गोंधवणी येथील ज्ञानाई आश्रमाचे ऋषिकेश महाराज वाकचौरे,हनुमान भक्त बाळकृष्ण महाराज कुलकर्णी, अंकुश महाराज जगताप,नारायण महाराज ससे,गणपत महाराज आहेर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी उपस्थित गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज,महंत रमेशगिरीजी महाराज,स्वामी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्यासह संत महंतांच्या हस्ते प्रभू श्रीराम चंद्राच्या प्रतिमेचे व अयोध्येतून आलेल्या मंगल अक्षता कलशाचे पूजन करण्यात आले.यावेळी हात उंचावून "सियावर रामचंद्र की जय" "जय श्रीराम...जय श्रीराम"असा जयघोष करण्यात आला.
विश्व हिंदू परिषदेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख पुज्यनिय माधवदास राठी महाराज यांनी आलेल्या संत महंतांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.अनेक वर्षांच्या संघर्षानंतर २२ जानेवारी २०२४ रोजी अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठा होणार असल्याने ही आपल्या सर्व रामभक्तांसाठी भूषणावह बाब असल्याचे सांगितले.
यावेळी बोलताना गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराज म्हणाले की विश्व हिंदू परिषदेने आतापर्यंत संत विचारानेच काम केले असे सांगून त्यांनी श्रीराम जन्मभूमीसाठी अनेकांनी आपले रक्त सांडले हया संघर्षात रक्ताचे पाट वाहिले,विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख अशोक सिंघल यांचे यासाठी मोठे कष्ट होते यामुळेच आज आपल्याला हा दिवस पहावयास मिळत आहे असे सांगून त्यांनी या संघर्षाच्या वाटचालीचा आलेख आपल्या भाषणातून उपस्थित रामभक्तांसमोर मांडला.सर्वांच्या शक्तीचे हे बळ आहे ."आता आपल्याला आपल्या भारताची संस्कृती व संस्कार काय आहे हे जगाला दाखवून आपल्या देशाची नवी ओळख जगाला करून द्यायची आहे त्यासाठी आपल्या सर्वांना यापुढील वाटचाल करायची आहे असे सांगून त्यांनी रामलल्लाच्या स्थापनेप्रसंगी संतांच्या साक्षीने घराघरात अक्षता पाठवा,गावागावात भजने गा,प्रतिमा मिरवणूक काढा,नव्या कपडे परिधान करून हा उत्सव दिवाळी व गुढीपाडव्यासारखा साजरा करा असे आवाहन केले.
यावेळी संत महंतांसह वारकरी संप्रदायातील कीर्तनकार महाराज मंडळी यांच्यासह विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी सुनील खिस्ति,श्रीकांत नळकांडे,उद्योजक प्रभाकर शिंदे, डॉ.अविनाश काळे,प्रशांत बहिरट,आकाश गायकवाड
यश कदम,हर्षद नरोडे,गणेश मुरदरे,शुभम गव्हाणे,सौ. अमृता नळकांडे,पूजाताई लष्करे,आदिनाथ पटारे,आबा मुळे यांच्यासह श्रीराम भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्तात्रय महाराज बहिरट यांनी केले तर हभप जनार्धन मेटे महाराज यांनी आभार मानले.संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पसायदानाने संत संमेलनाची सांगता करण्यात आली.
फोटो ओळी-विश्व हिंदू परिषदेच्या वतीने नेवासा तालुक्यातील देवगड येथे आयोजित संत संमेलनात श्रीराम अक्षता कलशाचे पूजन करतांना गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज समवेत उपस्थित संत महंत दिसत असून या संमेलनाला जमलेले श्रीरामभक्त दिसत आहे.
(छाया-सुधीर चव्हाण नेवासा)