शिवप्रहार न्युज - श्रीरामपूरच्या बहिण-भावाची शिर्डीत आत्महत्या...
श्रीरामपूरच्या बहिण-भावाची शिर्डीत आत्महत्या...
श्रीरामपूर (शिवप्रहार न्यूज)- श्रीरामपूर तालुक्यातील खैरी निमगाव येथील निखिल किशोर वारुळे, वय-30 व निकिता किशोर वारुळे, वय-25 हे दोघे बहिण-भाऊ काल शुक्रवार दि.१५ डिसेंबर रोजी शिर्डी येथे दर्शनासाठी गेले असता त्यांनी शिर्डीतील नगर-मनमाड रोड वरील हॉटेल साई यशराज मध्ये एकाच ओढणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळी एका डायरीवर आमच्या मृत्यूला कोणालाही जबाबदार धरू नये असे लिहिले असल्याचे समजते.
दरम्यान दोघांचेही मृतदेह काल रात्री उशिरा शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले होते. याप्रकरणी शिर्डी पोलिसांत आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहे.