शिवप्रहार न्युज - दागिने चोरणारी महिलांची टोळी पकडली; श्रीरामपूर शहर पोलिसांना एसपी.ओलांकडून ३५ हजाराचे बक्षिस...

शिवप्रहार न्युज -  दागिने चोरणारी महिलांची टोळी पकडली; श्रीरामपूर शहर पोलिसांना एसपी.ओलांकडून ३५ हजाराचे बक्षिस...

दागिने चोरणारी महिलांची टोळी पकडली; श्रीरामपूर शहर पोलिसांना एसपी.ओलांकडून ३५ हजाराचे बक्षिस...

   श्रीरामपूर (शिवप्रहार न्युज)- बसस्थानकावर गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील दागिने लांबवणाऱ्या एस.टी. कर्मचाऱ्यांच्या नेतृत्वाखालील बीड जिल्ह्यातील महिलांची टोळी जेरबंद करण्यात श्रीरामपूर शहर पोलिसांना यश आले असून आरोपींकडून १७ लाख ७७ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस प्रमुख राकेश ओला यांनी दिली. तसेच महिलांच्या टोळीला पकडण्याची कामगिरी करणाऱ्या श्रीरामपूर शहर पोलिसांना 35 हजारांचे बक्षीस जाहीर केले.

   श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्यात पत्रकार परिषदेत श्री. राकेश ओला यांनी ही माहिती दिली. या प्रकरणी आरोपींकडून पोलिसांनी ४ लाख ४० हजार रुपये किमतीचा १३४.२३ ग्रॅम व शेवगाव पोलीस ठाणे हद्दीतील ३ लाख ३७ हदार रुपये किमतीचे ६७.४० ग्रॅम असा एकूण ७ लाख ७७ हजार ५०० रुपये किमतींचे सोन्याचे दागिने व १० लाख रूपये किमतीची महिंद्रा स्कॉपीओ असा एकूण १७, ७७,५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

   आसराबाई उर्फ लक्ष्मी ऊर्फ आशाबाई तुकाराम पवार (वय ५५, रा. बार्शी नाका, जि.बीड), सुनिता योगेश जाधव (वय २५, गांधीनगर, नाळवंडी नाका, मोहटा देवी मंदिराजवळ, ता.जि. बीड), वसंत विश्वानाथ मुंजाळ (वय ३८, धंदा मेकॅनिक, एस.टी. आगार बीड, रा. हिरापूर ता. गेवराई जि.बीड सध्या एस.टी. कॉलनी बीड), जुबेर रज्जाक पठाण (वय २९, धंदा चालक, रा.मुन्नावर मस्जिद, तेलगाव नाका, ता.जि. बीड), कैशल्या सर्जेराव गायकवाड (वय ५२, रा. नाळवंडी नाका, जि. बीड), कमल विठ्ठल जाधव (वय ५३, रा.नाळवंडी नाका, खडी मशीनजवळ, बीड), सखुबाई सखाराम कुन्हाडे (वय ४०, रा. माऊलीनगर गेवराई, जि.बीड), गवळण पांडुरंग गायकवाड (वय ३५, रा.उकंडा, ता.पाटोदा, जि.बीड), शालनबाई लक्ष्मण जाधव (वय ५५, रा. नाळवंडी, जि. बीड अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहे.

   याबाबत अधिक माहिती अशी की, धनश्री हंबीरराव सरनौबत (रा. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी) या खोकर येथील त्यांच्या मैत्रिणीस भेटून त्या राहुरी येथे जाण्यासाठी २२ नोव्हेंबरला दुपारी अडीच वाजेच्या सुमारास श्रीरामपूर बस स्थानकावर आल्या. श्रीरामपूर-पुणे बसमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेवून अज्ञात व्यक्तीने त्याच्या गळ्यातील ४५ हजार रूपये किमतीचे दीड तोळे वजनाचे सोन्याचे मिनीगंठण चोरीला गेले. याप्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

   पोलिस निरीक्षक गवळी यांनी तात्काळ तपास पथकास सदर गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेण्याचे आदेश दिले. गुन्ह्यातील आरोपीचा व मुद्देमालाचा शोध घेत असतांना तपास पथकास गुन्ह्यामध्ये एक महिंद्रा स्कॉपीओ गाडी (क्र.एमएच १२ जीएफ ५६३७) गाडीचा वापर झाल्याची माहिती मिळाली. सदर आरोपीचा व वाहनाचा शोध घेत असतांना सकाळी ११ वाजेच्या सुमारास गुन्ह्यात वापरलेली गाडी व त्यामध्ये श्रीरामपूर बसस्थानकावर महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरणारी टोळी श्रीरामपूरकडे येत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे पथकाने तात्काळ हरेगाव फाटा येथे नाकाबंदी लावली. नेवासकडून श्रीरामपूरकडे येणाऱ्या संशयित वाहनाची तपासणी दरम्यान दुपारी १२ वाजेच्या सुमारास पांढऱ्या रंगाची महिंद्रा स्कॉर्पिओ गाडी नेवासेकडून येताना दिसली. तिला हाताने इशारा करुन थांबवण्यास सांगितले असता वाहनाचा वेग कमी होताच तीन- कर्मचारी वाहनाला लटकले. यानंतरही वाहन चालकाने वाहन न थाबंवता तसेच श्रीरामपूरच्या दिशेने नेले असता ते केसरीनंदन बॅग हाऊस दुकानासमोर पकडण्यात आले. चौकशी केल्यानंतर या टोळीने गुन्ह्याची कबुली दिली.

   यावेळी आरोपींजवळ श्रीरामपूर बसस्थानकावर व इतर ठिकाणी गर्दीचा फायदा घेवून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरलेल्या मुद्देमालाबाबत विचारणा केली असता त्यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यातील आठ व शेवगाव पोलीस ठाण्यातील एका गुन्ह्याची कबुली दिली.

  सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर स्वाती भोर तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, डॉ. बसवराज शिवपुजे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, हर्षवर्धन गवळी, यांचेकडील तपास पथकातील पोसई/ समाधान सोळंके, पोना/ रघुवीर कारखेले, पोकों/ राहुल नरवडे, पोकों/ गौतम लगड, पोकॉ/ गणेश गावडे, पोकॉ/ रमिझराजा अत्तार, पोकॉ/ संभाजी खरात, पोकों/ आकाश वाघमारे, मपोहेकॉ/लाव्हरे, मपोकों/ पुनम मुनतोडे, मपोकॉ/ अर्चना बर्डे, मपोकॉ/ मिरा सरग, मपोकॉ/ योगीता निकम, मपोकॉ/ पुनम बागुल, मपोकॉ/ रुपाली लोहाळे तसेच अप्पर पोलीस अधीक्षक कार्यलयाचे पोना/संतोष दरेकर, पोकों/ आकाश भैरट यांनी केली असुन दाखल गुन्हयाचा अधिक तपास हा पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गवळी यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके हे करीत आहेत.