शिवप्रहार न्युज - शिवस्मारकासह जिल्हा मागणीसाठी श्रीरामपुरात उद्या विराट मोर्चा; व्यापारी, वकील संघाचा जाहीर पाठिंबा…

शिवप्रहार न्युज -  शिवस्मारकासह जिल्हा मागणीसाठी श्रीरामपुरात उद्या विराट मोर्चा; व्यापारी, वकील संघाचा जाहीर पाठिंबा…

शिवस्मारकासह जिल्हा मागणीसाठी श्रीरामपुरात उद्या विराट मोर्चा; व्यापारी, वकील संघाचा जाहीर पाठिंबा…

 

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- श्रीरामपूर जिल्हा कृती समिती व शिवप्रहारच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवस्मारकासह (शिवपुतळा) सरकारने "श्रीरामपूर जिल्हा " घोषित करावा हया मागणीकरिता उद्या शनिवार दि. २०/१/२०२४ रोजी सकाळी १०:०० वा. आझाद मैदान, लोकमान्य टिळक वाचनालयासमोर, मेनरोड, श्रीरामपूर शहर येथून मोर्चा काढण्यात येणार आहे. सदरचा मोर्चा हा आझाद मैदान येथुन निघुन मेनरोडमार्गे -भगसिंगचौक- धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक- गिरमे चौक- तुळजाभवानी चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक - महात्मा गांधी पुतळा-श्रीराम मंदिर चौक असा निघणार असून मेनरोडवरील श्रीराम मंदिर चौकामध्ये मोर्चाचा समारोप होणार आहे.पूर्णपणे लोकशाही मार्गाने होणाऱ्या या मोर्चाच्या माध्यमातून सरकारचे व प्रशासनाचे छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवस्मारकासह (शिवपुतळा) "श्रीरामपूर जिल्हा व्हावा या मागणीबाबत लक्ष वेधण्यात येणार आहे.

         तसेच नगर जिल्हयाचे विभाजन झाले तर श्रीरामपूर हाच नविन जिल्हा होणार नाहीतर जिल्हा विभाजन होणार नाही व इतर कोणत्याही ठिकाणी जिल्हा मुख्यालय होवू देणार नाही असे श्रीरामपूर जिल्हा कृती समितीचे ठाम मत असल्याचे समितीचे अध्यक्ष प्रताप (नाना) भोसले यांनी सांगितले. तसेच शिवप्रहार प्रतिष्ठानचे प्रमुख माजी पोलीस अधिकारी सुरजभाई आगे यांनी सांगितले की, प्रभू श्रीरामांच्या नावाने म्हणजेच “श्रीरामपूर” हया नावाने भारतात जिल्हा अस्तित्वात नाही. तरी हिंदुस्थानातला श्रीरामांच्या नावाचा पहिला जिल्हा होण्याचा मान श्रीरामपूरला मिळावा यासाठी आम्ही लोकशाही मार्गाने काढत असलेल्या व बिगरराजकीय नेतृत्वाखाली होणाऱ्या या मोर्चात सर्वसामान्य श्रीरामपूरकरांनी सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात येत आहे. गेल्या ०४ महिन्यापासून चालू असलेल्या श्रीरामपूर जिल्हा मोहिमेला देखील श्रीरामपूरकरांचा भरघोस पाठिंबा मिळत असून व्यापारी, वकील संघांनी देखील या मोर्चाला पाठींबा दिला आहे. प्रचंड मोठया संख्येने श्रीरामभक्त-शिवभक्त या मोर्चामध्ये सामील होणार आहे.आपणही व्हावे.