शिवप्रहार न्युज - बेलापुरात साडी डे ला विद्यार्थिनीची छेडछाड;अली वर गुन्हा दाखल…

शिवप्रहार न्युज - बेलापुरात साडी डे ला विद्यार्थिनीची छेडछाड;अली वर गुन्हा दाखल…

बेलापुरात साडी डे ला विद्यार्थिनीची छेडछाड;अली वर गुन्हा दाखल…

बेलापूर (प्रतिनिधी)-येथील एका विद्यार्थीनीला काल साडी डे निमित्त साडी घालुन आली असता “तू पोर्नस्टार मियाँ खलिफा आहे ना, तिच्यासारखी दिसते', अशी टिप्पणी करत व मुलीने यावर जाब विचारला असता आज शुक्रवारी सकाळी तिचा हात धरत,तिची छेडछाड करत,तिचा विनयभंग करण्याचा प्रकार बेलापुरात घडला आहे.या प्रकारामुळे बेलापुरात दोन समाजाचा जमाव एकमेकांच्या समोर आल्याने काही काळ तणाव झाला होता. सदर तरूणाविरोधात दुपारी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

      याबाबतची अधिक माहिती अशी की, सदर १९ वर्षे वयाचा तरूण हा एस.वाय. बीए मध्ये शिकतो.त्याच्याच वर्गात ही विद्यार्थीनीही शिकते. काल हि विद्यार्थीनी साडी डे निमित्त साडी घालुन आली असता या तरूणाने या मुलीजवळ जाऊन तिला तो म्हणाला की, 'तू पोर्नस्टार मियाँ खलिफा आहे ना, तिच्यासारखी दिसते'. त्यावर ही मुलगी म्हणाली की, 'तू असं का बोलला ?' तेव्हा हा तरूण या मुलीच्या आणखी जवळ गेला आणि तिचा हात धरून तिला जवळ ओढले. त्यामुळे ही मुलगी अत्यंत घाबरली. हा प्रकार रस्त्याने येणाऱ्या-जाणाऱ्यांनी पाहिला. त्यामुळे काही गावातील हिंदुत्ववादी तरूण तसेच इतर लोक त्या ठिकाणी जमले. त्यांनी सदर तरूणाला त्याठिकाणी जाब विचारला. 

       त्यानंतर सदर तरूणाला घेवून हे लोक बेलापूर पोलीस दूरक्षेत्र येथे आले. सदर तरूणावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी त्यांनी केली.दरम्यानच्या काळात सदर तरूणाने आपल्या समाजाच्या काही तरूणांना बोलावले. त्यामुळे बेलापूर पोलीस स्टेशन परिसरात दोन समाजातील लोक त्याठिकाणी जमा झाले. त्यामुळे तणाव निर्माण झाला. यावेळी पोलीस फौजफाटाही याठिकाणी आला.     

         दरम्यान अली शेख नावाच्या या छेड काढणाऱ्या तरूणावर पोलिसांनी दुपारी गुन्हा दाखल केला आहे.सदर तरूणाने काही लोकांना फोन केल्याने त्याचे समर्थक दुपारी जमल्यानंतर तणाव वाढू लागल्याने पोलिसांनी काहींना काठ्या मारत या ठिकाणाहून हुसकावले.

       यावेळी बोलताना पोनि. नितीन देशमुख म्हणाले की, आम्ही यातील गुन्हेगाराला ताब्यात घेवून कारवाई केलेली आहे. मात्र गावात कोणीजर कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही कोणाला सोडणार नाही. पोलीस आपले काम करत आहे. कोणीही कायदा हातात घेण्याचा प्रयत्न केल्यास त्याला कायदा काय असतो? हे दाखवून देवू असा इशारा यावेळी त्यांनी दिला.