शिवप्रहार न्युज - श्रीरामपूरचा लाचखोर वजनमापे निरीक्षक गायकवाडच्या घरातून मिळाली साडे 28 लाखाची रोकड…
श्रीरामपूरचा लाचखोर वजनमापे निरीक्षक गायकवाडच्या घरातून मिळाली साडे 28 लाखाची रोकड…
श्रीरामपूर -येथे वजनमापे कार्यालयात कार्यरत असलेला लाचखोर वजनमापे निरीक्षक अशोक गायकवाड याला नुकतेच प्रवरानगर येथे एका पेट्रोल पंपाच्या तपासणी बाबतचे प्रमाणपत्र देण्यासाठी स्वीकारलेल्या दहा हजार रुपयाची लाचेबाबत अटक करण्यात आली होती.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्याच्यावर गुन्हा देखील दाखल केला होता.
दरम्यान लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने अशोक गायकवाडच्या पुणे येथील सिंहगड रोडवरील घरात पंचनामा केला असता त्यामध्ये साडे 28 लाख रुपयांची रोकड मिळून आली. यावरून हे सिद्ध होत आहे की,सरकारी अधिकारी ,लोकसेवक किती मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार करतात.